बंगळुरू : बंगळुरूत एका 'मजुरा'नं आपला आयकर परतावा फाईल केला तेव्हा धक्कादायक सत्य बाहेर आलं... यामुळे आयकर विभागासोबतच पोलिसांनाही धक्का बसलाय.


उत्पन्नाचा स्रोत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रचप्पा रंगा नावाच्या एका व्यक्तीनं आपणं 'मजूर' असल्याचं सांगत आपलं वार्षिक उत्पन्न ४० लाख असल्याचं जाहीर करत आयकर परतावा भरला. यावेळी त्यानं आपल्या उत्पन्नाचा स्रोत जाहीर करणं मात्र टाळलं होतं. 


हे ध्यानात आल्यानंतर आयकर विभागान आणि पोलिसांनी त्याच्याविरुद्ध चौकशी सुरू केली. आयकर अधिकाऱ्यांनी रचप्पाला चौकशीसाठी बोलावलं. पोलिसांचीही त्याच्यावर नजर होतीच. चौकशीत त्यांच्यासमोर धक्कादायक माहिती उघड झाली.


अधिक वाचा : एक असाही मुख्यमंत्री ज्यांनी आजपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केलंच नाही...


चौकशीत धक्कादायक खुलासा


पोलिसांच्या चौकशीत समजलं की रचप्पा हा एक ड्रग डीलर आहे. 'टाईम्स'नं दिलेल्या माहितीनुसार, रचप्पा २०१३ पर्यंत मजुरीचं काम करत होता. त्यानंतर त्याचा ड्रग्जचा धंदा करणाऱ्या लोकांशी संपर्क आला आणि त्यानंही हे अवैध काम सुरू केलं. 


रचप्पानं या धंद्यात करोडोंची कमाई केली. त्यानं अनेकांना या धंद्याकडे आकर्षित केलं. यामध्ये त्याला इतका फायदा झाला की कनकपुरा रोड भागातील एक महागडा विला त्यानं भाड्यानं घेतला. 


अधिक वाचा : ३ लाखांपर्यंतचं उत्पन्न होऊ शकतं टॅक्स फ्री, कंपनी करातही कपातीची शक्यता


गेल्या काही वर्षांत त्यानं आपल्या गावात संपत्तीही खरेदी केलीय. वकिलांच्या सल्ल्यानं त्यानं स्वत:ला क्लास-१ चा ठेकेदार म्हणून रजिस्टरही केलं. 


परंतु, इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केल्यानंतर त्याचा सगळा डाव उलटा पडला. पोलिसांनी रचप्पा आणि त्याच्या एक साथीदार श्रीनिवास याला अटक केलीय. त्यांचा आणखी एक साथीदार सध्या फरार आहे. 


अधिक वाचा : श्रीमंत देशांच्या यादीमध्ये भारत सहाव्या स्थानी!