मुंबई : सध्या लग्न सराई असल्यामुळे लग्नामंडपातील अनेक किस्से समोर येत आहेत. कधी नवरी मंडपात डान्स करत येते  तर कधी नवरा होणाऱ्या बायकोला इम्प्रेस करण्यासाठी कहीतरी शक्कल लढवता आपण बघीतलं असेल. सोशल मीडियाच्या जगात असे व्हिडिओ तुफान व्हायरल होतात. पण आता व्हायरल होत असललेल्या व्हिडिओमध्ये तर नवरदेव चक्क दारूच्या नशेत मंडपात उभा राहिला. नशेत आलेल्या नवरदेवाला पाहून जमलेल्या सर्वांना मोठा धक्का बसला. जमलेल्या पाहुण्यांची अशी परिस्थिती झाली असेल तर नवरीची स्थिती कशी झाली असेल. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारूच्या नशेत मंडपात पोहोचलेला हा नवरदेव पूर्णपणे बेशुद्ध असलेला दिसत आहे. लग्नमंडपात हार घालण्याची विधी सुरू होती तेव्हा नवऱ्यामुलाला हार घालण्याची  देखील शुद्ध नव्हती. मुलगी सर्व प्रकार शांतपणे पाहाते. तेव्हा नवऱ्यामुलाचा एक मित्र त्याला  उभं राहण्यास मदत करतो आणि नवरदेवाला हार नवरीला हार घालायला सांगतो. 


नशेत असलेल्या नवऱ्याला सरळ उभं देखील राहाता येत नव्हतं. तो नवरीला हार देखील घालू शकत नाही. तेव्हा नवरीचा पार चढतो आणि ती नवरदेवाला जोरदार धक्का देते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.