नवरदेव-नवरीला थेट जेलमध्ये टाकलं...कोरोनाच्या नियमांमुळे नाहीतर...
या वर-वधूंच्या नशीबात काही वेगळचं होतं. त्यांची वरात थेट पोलिस स्टेशनमध्येच गेली आणि तेथेच त्यानी आपल्या लग्नाची पहिली रात्र काढली.
फतेहपूर : लग्नानंतर प्रत्येक वधू-वरची वरात निघते जी वाजत गाजत त्यांना घरी घेऊन जाते आणि त्यानंतर घरचे लोकं त्यांचे स्वागत करताता आणि मग वर-वधू आपल्या लग्नाची पहिली रात्र साजरा करतात. परंतु या वर-वधूंच्या नशीबात काही वेगळचं होतं. त्यांची वरात थेट पोलिस स्टेशनमध्येच गेली आणि तेथेच त्यानी आपल्या लग्नाची पहिली रात्र काढली. हे सगळे घडले ते या वरातीमधील वऱ्हाड्यांमुळे. खरंतर, वर-वधू आणि वऱ्हाडी ट्रेनमधून अहमदाबादवरून फतेहपूर सिक्रीकडे जात होते. त्यावेळी वऱ्हाड्यांनी दारू पिऊन ट्रेनमध्ये दंगा सुरु केला. एवढेच नाही तर या वऱ्हाड्यांनी ट्रेनमध्ये चढलेल्या अन्य प्रवाशांव्यतिरिक्त जीआरपी जवानांनाही मारहाण केली.
दारूच्या नशेत या लोकांनी जीआरपी जवानांची हत्यारे हिसकावून घेतली, तेव्हा मात्र जीआरपी जवानांचा ताबा सुटला आणि त्यांनी वऱ्हाड्यांना अटक करण्याचे ठरवले. त्यानंतर जीआरपीने त्यांनी अटक केली त्याच बरोबर त्यांनी वर-वधूलाही पोलिस ठाण्यात नेले.
जीआरपी सीओ कल्पना सोलंकी यांनी सांगितले की, रविवारी रात्री मिरवणूक अहमदाबादला ट्रेनमधून फतेहपूर सिक्रीकडे जात होती. रात्री 12 वाजल्यानंतर ट्रेनमधील वऱ्हाड्यांनी दारू पिण्यास सुरुवात केली. त्यानंतर या वऱ्हाड्यांनी प्रवाशांना मारहाण केली.
जेव्हा प्रवाशांनी जीआरपीला याबाबत माहिती दिली, तेव्हा जीआरपी जवान घटनास्थळी पोहोचले. वऱ्हाडी इतक्या नशेत होते की, त्यांना जीआरपी जवानांचीही भिती उरली नाही. त्यांनी मद्यधुंद अवस्थेत जीआरपी जवानांना मारहाण केली आणि त्यांच्या हातातून शस्त्रे हिसकावून घेतली.
एवढेच नाही तर या वऱ्हाड्यांनी साखळी खेचण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर कंट्रोल रूमला माहिती दिल्यानंतर ट्रेन थांबवण्यात आली. त्यानंतर जीआरपीने या आरोपींविरोधात कडक कारवाई केली आणि वर-वधूलीही पोलिस स्टेशनमध्ये नेले. जेथे त्यांनी एक रात्र काढावी लागली.
वर-वधूची कोणतीही चूक नाही
या संपूर्ण प्रकरणात वर-वधूचा कोणताही दोष नसल्याचे कल्पना सोलंकी यांनी सांगितले, परंतु त्यांच्या लग्नाची ही वऱ्हाड असल्याने वर-वधूला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जावे लागले. या घटनेनंतर जीआरपीने सोमवारी दहा आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे आणि वर-वधूला घरी पाठवले आहे.