नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली परिवहन निगमच्या (डीटीसी) एका बसमध्ये शूट करण्यात आलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक तरुणी डीटीसीच्या बसमध्ये सपना चौधरीच्या 'तेरी आंख्यो का ये काजल' या गाण्यावर थिरकताना दिसतेय. तिच्यासोबत बसमध्ये मार्शल आणि बसचा वाहकही यावेळी उपस्थित होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डीटीसी व्यवस्थापनानं बसच्या स्टाफवर कारवाई केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली परिवहन निगमनं दिल्ली होम गार्डच्या जवानाला परत धाडलंय. बस चालकाला निलंबत करण्यात आलंय तर कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या वाहकाला कारणे दाखवा नोटीस देण्यात आलीय. नोकरीवरून का हटवण्यात येऊ नये? असा प्रश्न विचारत ७२ तासांत वाहकाला उत्तर देण्यास बजावण्यात आलंय. 


१२ जून रोजी हा व्हिडिओ व्हायरल होताना निदर्शनास आलं होतं. मोबाईल ऍपवर शूट करण्यात आलेला हा व्हिडिओ दिल्लीच्या जनकपुरी भागात बनवण्यात आला होता. व्हिडिओमध्ये हिरो आणि कॅरेक्टर आर्टिस्ट दिसत आहेत ते अभिनेते नाहीत तर सरकारी बसचे चालक, वाहका आणि मार्शल आहेत. डीटीसी बसच्या ७४० क्रमांकाच्या मार्गावर चालणाऱ्या बसमध्ये हा व्हिडिओ बनवण्यात आला होता. 


चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, चालकानं बस ड्युटीदरम्यान दुसऱ्याच एका मार्गावर घेऊन गेला. या दरम्यान या तरुणीनं हा व्हिडिओ शूट केला. पहिल्यांदा तिनं एक व्हिडिओ बसमध्ये शूट केला तर आणखी एक व्हिडिओ बसच्या समोरही शूट करण्यात आला. त्यानंतर या तरुणीनंच हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला. त्यानंतर तो व्हायरल झाला.