डुकाटीची सुपरस्पोर्ट 950 सुपरबाईक भारतात लॉंच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
इटलीची सुपरबाईक मॅन्युफॅक्चरर कंपनी डुकाटीने(Dukati)गुरूवारी भारतात आपली नवीन सुपरबाईक सुपरस्पोर्ट्स 950 लॉंच केली आहे.
मुंबई : इटलीची सुपरबाईक मॅन्युफॅक्चरर कंपनी डुकाटीने(Dukati)गुरूवारी भारतात आपली नवीन सुपरबाईक सुपरस्पोर्ट्स 950 (SuperSport 950) लॉंच केली आहे. ही सुपरबाईक युवकांना आकर्षित करणार आहे. बाईकचे अनेक शानदार फिचर्स आणि लूक ग्राहकांना भूरळ घालणार आहे.
दोन मॉडेल सादर
कंपनीने सुपरबाईकचे दोन मॉडेल सुपरस्पोर्ट्स 950 आणि सुपरस्पोर्ट्स 950एस सादर केले आहेत.
किंमत
सुपरबाईक सुपरस्पोर्ट 950 ची एक्स शोरूम किंमत 19.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर सुपरस्पोर्ट 950 एसची किंमत 15.49 लाख रुपये आहे.
कंपनीचे म्हणणे
डुकाटी इंडियाचे प्रबंध निर्देशक बिपुल चंद्राने म्हटले की, पॅनिगेल सिरीजच्या रेसिंग डीएनएला जास्त सोप्या पॅकेजमध्ये सादर करण्यासाठी नवीन सुपरस्पोर्ट 950 लॉंच करण्यात आली आहे.
इंजिन
डुकाटीच्या या सुपरबाईक सुपरस्पोर्ट 950 मध्ये 937 सीसीचे दोन सिलेंडर इंजिन आहे. आणि हे इंजिन भारतातील बीएस 6 मानकांच्या स्टॅडर्डनुसार आहे.