भर मांडवात वधुने नवरदेवाच्या कानशिलात लगावत दाखवले तारे; लग्नमंडपात असं नेमकं काय घडलं?
Trending News In Marathi: लग्नाचा मांडव सजला होता, नातेवाईकांचा गोतावळा जमला होता. लग्नाच्या विधींना सुरू होणार इतक्यात नवरीने नवरदेवाच्या थेट कानशिलातच लगावली.
Trending News In Marathi: लग्नाचे बंधन हे अतूट असते पण हल्लीच्या काळात छोट्या छोट्या गोष्टीतून वाद होतात आणि हे वाद विकोपाला जातात. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्येही लग्नाच्या मांडवातच एक धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरुन वधु-वरात वाद झाला आणि थेट लग्नच मोडले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दारात लग्नाचा मांडव पडला होता. नवरदेवही बरात घेऊन आला होता. मात्र, लग्नाच्या विधींना उशीर झाला या कारणामुळं नवरदेव व नवरीत वाद झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की एकमेकांनी दोघांनाही कानशिलात लगावली. वधु-वरातील या वादामुळं लग्नच रद्द करावं लागले आहे.
काय घडलं नेमकं?
सोमवारी एका जोडप्याचे प्रेमविवाह होणार होता. मात्र लग्नाच्या आधीच दोघांमध्ये वाद झाले. वधु दिल्ली येथे खासगी कंपनीत नोकरीला आहे तर तिच्याच कंपनीत नवरदेवही काम करतो. एकाच कंपनीत असल्याने त्यांची ओळख झाली आणि पुढे ते प्रेमात पडले. दोघांच्या नात्याविषयी घरच्यांना कळल्यानंतर त्यांनी त्यांच्या नात्याला परवानगी देत लग्न करण्यास होकार दिला. सोमवारी त्यांचे लग्न होणार होते. नवरदेव वरात घेऊन वधुच्या घरीदेखील पोहोचला होता.
मात्र, लग्नाच्या विधींना उशीर झाला त्यावरुन वधु आणि वरपक्षात थोडे वाद होण्यास सुरुवात झाली. मात्र, त्याचवेळी मध्यस्थींनी हा वाद शांत केले होते. मात्र, वरमालाच्या विधींना उशीर होत असल्याने वधु-वर दोघांचाही रागाचा पारा चढला होता. त्यातच वधुने नवरदेवाच्या कानशिलात लगावली. वधु्च्या या कारनाम्याने नवरदेवानेही तिला जोरात कानशिलात लगावली. हे प्रकरण शांत होण्यापेक्षा अधिकच चिघळले. प्रकरण इतके चिघळले की दोघांनी लग्न करण्यास नकार दिला आणि पोलिसांना या प्रकरणी सूचना दिली.
पोलसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरण शांत केले. पोलिसांच्या समोरही दोन्ही पक्षांनी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर लग्नाच खर्च झालेले पैसे परत देण्याबाबत चर्चा झाली व वधु व वरपक्षाच्या संमतीने पैसे परत देण्यात आले. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वधु-वरांनी एकमेकांना थप्पट लगावल्याची काही माहिती नाहीये. मात्र, वध-वर पक्षात वाद झाल्याने दोघांनी लग्न करण्यास नकार दिला. दोन्ही पक्षाकडून कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये. तर तक्रार दाखल झाली तर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.