देशभरात आज दसऱ्याचा उत्साह, पाहा कुठे कशी आहे तयारी
देशभरात आज दसरा साजरा करण्याची जोरदार तयारी सुरू झालीयं.
मुंबई : देशभरात आज दसरा साजरा करण्याची जोरदार तयारी सुरू झालीयं.शिर्डीत आज विजयादशमी आणि साई समाधी शताब्दी सोहळा मोठ्या थाटात पर पडतोय. हा सोहळा पाहण्यासाठी आणि बाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी मेठी गर्दी केलीय. पहाटे शेकडो भाविकांच्या उपस्थितीत साईंची काकड आरती करण्यात आली. साई समाधी शताब्दी सोहळ्याचं विशेष वृत्तांकन झी २४ तासवर आपण पाहू शकणार आहात.
गंजगोलाईच्या मंदिरात रोषणाई
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला लातूर शहरातील गंजगोलाईच्या जगदंबा मातेच्या मंदिर परिसर दरवर्षीप्रमाणे यंदाही रोषणाईनं उजळून निघालाय.
लातूरचे छायाचित्रकार श्याम भट्टड यांनी आपल्या ड्रोन कॅमेऱ्यातून चित्रित केली. या गंजगोलाईचे वैशिष्ठय म्हणजे हे महाराष्ट्रातील एकमेव गोल मार्केट आहे.
गंजगोलाईत १६ वेगवेगळे रस्ते आहेत. हे सर्व १६ सोळा रस्ते एकाच ठिकाणी येऊन मिळतात.
तसेच या १६ रस्त्यावर भांडीगल्ली, कापड लाईन, सराफ मार्केट, भुसार लाईन असे वेगवेगळे बाजार आहेत.
दरवर्षी नवरात्रीच्या निमित्तानं गंजगोलाई प्रकाशात न्हाऊन निघते.
नागपूरात पथसंचलन
नागपूरमध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला पहाटेचं सुरुवात झालीय. संघ स्वयंसेवकांनी शहरात घोषवाद्यासह पथसंचलन केलं. सरसंघचालक मोहन भागवत यांनी पथसंचलानाचं निरीक्षण केलं.
यावेळी विजयादशमी उत्सवाला नोबेल पारितोषक विजेते कैलाश सत्यार्थी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.
पथसंचलनाच्या निरीक्षणाच्या वेळी तेही उपस्थित होते.
त्यानंतर रेशीमबागेत पारंपरिक पद्धतीनं शस्त्रपूजन करण्यात आलं.
थोड्याच वेळात सरसंघचालक विजयादशमीच्या निमित्तानं आपले विचार मांडणार आहेत.