नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील आभाळ धुळीने व्यापले आहे. राजस्थानमध्ये धुळीचे वादळ आल्याने याचा परिणाम दिल्लीवर झालाय. जोरदार वारे यामुळे याचा प्रभाव आणखी तीन दिवस राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, हवेतील प्रदुषणात मोठी वाढ झाली आहे. या धुळीच्या वादळाचा हवाई वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानात आलेल्या धुळीच्या वादळामुळेच दिल्लीत धुळीने आकाश व्यापले आहे, असे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पर्यावरण मंत्रालयाने एक पत्रक जारी केले असून त्यात पुढील तीन दिवस दिल्लीतील हवामानाची स्थिती अशीच राहील, अशी भीती वर्तविली आहे. 



दरम्यान, दिल्लीत हवेचे प्रदूषण नसून हा राजस्थानमधील धुळीच्या वादळाचा परिणाम असल्याचे पर्यावरण मंत्रालयाने म्हटले आहे. हवेतील प्रदूषणामुळे दिल्लीचं आभाळ धुरकट झाल्याचे बोलले जात होते मात्र, पर्यावरण मंत्रालयाने त्याचा इन्कार केलाय.  


१० ते १२ जून यादरम्यान राजस्थानात झालेल्या धुळीच्या वादळाचे वारे दिल्लीच्या दिशेने वाहत होते. त्यामुळे दिल्ली-एनसीआर भागाला फटका बसला. हवेतील धुळीचे प्रमाण कमी होण्यास आणखी किमान तीन दिवस लागतील, असे हवामान विभागाचा हवाला देत पर्यावरण विभागाने म्हटलेय.