नवी दिल्ली : धुळीचं वादळ आणि मुसळधार पावसानं चार राज्यांना तडाखा दिलाय. या नैसर्गिक आपत्तीत 41 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. धुळीचं वादळ, तसंच मुसळधार पाऊस यासह प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांनी, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि देशाची राजधानीमधलं जनजीवन कोलमडून टाकलं. यापैकी पश्चिम बंगालमध्ये किमान १२ जणांचा मुसळधार पावसामुळे मृत्यू झाला. तर उत्तर प्रदेशमध्ये १8, आंध्र प्रदेशात ९ आणि दिल्लीत २ जणांचा मृत्यू झाला. हवामान विभागाच्या अंदाजा नुसार आजही दिल्लीसह इतर काही राज्यांना या वादळाचा तडाखा बसणार आहे.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दरम्यान वादळामुळे विमानसेवा आणि मेट्रो सेवा पुरती कोलमडून गेलीये. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरयाणा, चंदीगढ, मध्यप्रदेश, झारखंड, आसाम मेघालय, महाराष्ट्रातील उत्तरेकडील  भाग, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, या राज्यांनाही या वादळाचा तडाखा बसलाय. दिल्लीत ताशी 109 किमी वेगाने धुळेचे वादळ आले त्यामुळे शहरातील विमान, मेट्रे, रेल्वे आणि रस्तेवाहतूक केलमडून गेली..