रामराजे शिंदे, झी २४ तास, मुंबई : ई-श्रम कार्डचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगारांना दिला जातो. यामध्ये रस्त्यावरील विक्रेते, घोडेस्वार, रिक्षा आणि हातगाडी चालक, न्हावी, धोबी, शिंपी, फळे-भाजीपाला आणि दूध विकणारे लोक यांचा समावेश आहे. याशिवाय घरे बांधकामातील कामगारांचाही समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ई-श्रम पोर्टलवर दररोज मोठ्या संख्येने कामगार नोंदणी करत आहेत. अनेकांना प्रश्न पडतो की शेतकरी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करू शकतात की नाही? ई-श्रमच्या अधिकृत वेबसाइटनुसार, केवळ शेतमजूर आणि भूमिहीन शेतकरी येथे नोंदणी करू शकतात. इतर शेतकरी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यास पात्र नाहीत.


या मजुरांना लाभ मिळतो लाभ


ई-श्रम कार्डचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगारांना दिला जातो. यामध्ये रस्त्यावर विक्रेते, घोडेस्वार, रिक्षा आणि हातगाडी चालक, न्हावी, धोबी, शिंपी, फळे-भाजीपाला आणि दूध विकणारे लोक यांचा समावेश आहे. याशिवाय घरे बांधकामात गुंतलेल्या कामगारांचाही समावेश आहे.


लेबर कार्डसाठी नोंदणीची प्रक्रिया


  • यावर नोंदणी करण्यासाठी, eshram.gov.in या ई-श्रमिक पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा.(e shram card online apply)

  • मुख्यपृष्ठावर, 'e-SHRAM वर नोंदणी करा' या लिंकवर क्लिक करा.(shram card registration online)

  • आता आधार लिंक केलेला मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाका. त्यानंतर send OTP वर क्लिक करा

  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा.


जर एखाद्या कर्मचाऱ्याकडे आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर नसेल, तर तो बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे जवळच्या CSC केंद्रावर नोंदणी करू शकतो.


या ठिकाणी करा नोंदणी


ऑनलाइन नोंदणीसाठी कामगार ई-श्रमचे मोबाइल अॅप किंवा वेबसाइट वापरू शकतात. तसेच यासाठी पोस्ट विभागाच्या कॉमन सर्विस सेंटरमध्ये (CSC), सेतु सुविधा केंद्रामध्ये जाऊन नोंदणी करता येते.


नोंदणीनंतर, असंघटित कामगारांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) असलेले ई-श्रम कार्ड दिले जाईल. हा युनिव्हर्सल अकाउंट नंबर देशभरात मान्य असेल.


16 ते 59 वयोगटातील कामगारांना सुविधा मिळणार


विशेष म्हणजे असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यात नाव नोंदवण्यासाठी उत्पन्नाचा कोणताही निकष नाही. तसेच व्यक्ती करदाता नसावी ही अट आवश्यक आहे. कोणताही असंघटित क्षेत्रातील कामगार ज्यांचे वय 16 ते 59 वर्षे आहे ते त्यांचे नाव या योजनेसाठी नोंदवू शकतात.