नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक बिल (ई बिल) लागू करण्यासाठी सरकारने १ एप्रिल हा दिवस निश्चित केला आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ५० हजार रुपयांहुन अधिक सामान घेऊन जाण्यासाठी याची आवश्यकता असेल. याव्यतिरिक्त केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क बोर्ड (सीबीईसी) ने संक्षिप्त जीएसटीआर-3 बी रिटर्न भरण्यासाठी जून पर्यंतचा वेळ दिला आहे. यापूर्वी कोणत्याही महिन्याचा जीएसटीआर-3 बी रिटर्न पुढच्या महिन्याच्या २० तारखेपर्यंत भरावा लागत होता.


१० मार्चच्या बैठकीत झाला निर्णय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेने १० मार्चच्या बैठकीत ई वे बिल आणि 3 बी रिटर्न भरण्याची तारीख वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. १ फेब्रुवारीला लागू करण्यात आलेल्या या प्रणालीत अडथळा आल्याने मद्देनजर परिषदेने ई-वे बिल लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  


कर रोखण्यासाठी


कर रोखण्यासंदर्भातील हे एक पुढचे पाऊल असल्याचे बोलले जात आहे. यामुळे रोख व्यापारावर लगाम लागेल. जीएसटी निरीक्षकालाही ई वे बिल सादर करण्यात येईल. ई-वे बिल १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या 50,000 रुपयांहुन अधिक मालाच्या ट्रान्सपोर्टवर ई-वे बिल लावण्यात येईल.


जूनपर्यंतची अनुमती


यासोबतच सरकारने व्यापाऱ्यांसाठी संक्षिप्त विक्री रिटर्न जीएसटीआर- 3बी आणि अंतिम विक्री रिटर्न जीएसटीआर-1 जूनपर्यंत भरण्याची अनुमती दिली आहे.