नवी दिल्ली : जर तुमच्याकडे कॉम्यूटर आणि इंटरनेट असेल तर तुम्हीही चांगली कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. घरी बसून तुम्हाला चांगली कमाई करण्याची संधी निर्माण झालीयं. याच्या ५ पद्धती पाळल्या तर प्रति तास हजार रुपये कमावू शकता.


१) वर्चुअल कॉल सेंटर एजंट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही घरी बसून कॉल सेंटर एजंटचे काम करु शकता. LiveOps.com या साईटवर जाऊन तुम्ही कंपनी बनवू शकता. होमपेज उघडल्यानंतर तुम्ही एजंट बनण्यासाठी अप्लाय करू शकता. इंग्रजी चांगली येत असेल तर तुम्ही ग्राहकांशी थेट संवाद साधू शकता पण जर इंग्रजी चांगली नसेल तरीही काळजी करण्याचे कारण नाही. कारण कॉल लागल्यावर कंपनी तुम्हाला काय बोलायचय याबद्दल माहीती देईल. जे आपल्याला बोलायच असेल ते स्क्रिनवर लिहून येईल. या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही ७ ते १५ डॉलक कमाऊ शकताय 


२) स्वागबक्स.कॉम


(http://www.swagbucks.com) स्वागबक्स डॉट कॉम ही एक प्रसिद्ध वेबसाईट आहे. ज्यावर फ्री रजिस्टर करून तुम्ही कमाई सुरू करू शकता. फेसबुकच्या माध्यमातूनही तुम्ही जोडले जाऊ शकता. दैनंदिन वापरातील वस्तू जस की मोबाईल, हार्ड डिस्क, मग, टी शर्ट अशा गिफ्ट साइटवर तुम्हाल काही वेळ घालवावा लागेल. यातून शॉपिंगपासून सर्चिंग, प्रश्नउत्तर, आणि प्रोडक्टसंबंधी माहिती घ्यावी लागेल. याबदल्यात वेबसाईट तुम्हाला काही पॉईंट्स देईल याचा उपयोग तुम्ही शॉपिंगसाठी करू शकता किंवा कॅशमध्येही रुपांतरीत करु शकता. 


३) ऑनलाईन वर्क 


www.odesk.com आणि www.elance.com या साईट्स ऑनलाईन पैसे कमाविण्याच्या बाबतीत प्रसिद्ध आहेत. सर्वात आधी एक टेस्ट देऊन तुम्हाला आपण या साईटसाठी युजफुल असल्याचे सिद्ध करावे लागेल. एकदा रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट किंवा फ्रिलान्स काम करवून घेऊ शकता. काम झाल्यावर किंवा प्रत्येक तासाला यातून पैसे मिळतात. जगभरातील अनेक वेबसाईट असं करतात. 


४) सेल्फ पब्लिश बुक 


जर तुम्हाला लिहिण्याची आवड असेल तर ऑनलाईन बुक लिहिण्यापासून ते रॉयल्टी कमाविण्यापर्यंतची संधी तुम्हाला मिळू शकते. अमेझॉन ही अशीच संध देणारी एक साइट आहे. अमेझॉन किंडल डायरेक्ट पब्लिशिंग नावाचे हे फिचर चालवते. यामध्ये कोणतेही ऑनलाईन बुक लिहून त्याला किंडल बुकस्टोरवर टाकू शकता. याच्या विक्रीवर ७० टक्के रॉयल्टी मिळते. साईट आणि सेल्फ पब्लिश बुकच्या माहितीसाठी https://kdp.amazon.com वर क्लिक करा. इथे अकाऊंट बनवून तुम्ही रेग्युलर मेंबरही बनू शकता. 


५) पेड रिव्ह्यू 


सॉफ्टवेअर किंवा अन्य उत्पादनांसाठी रिव्ह्यू लिहिणे. जर लेखन हा तुमचा प्लस पॉईंट असेल तर तुम्ही त्यामाध्यमातूनही कमाई करू शकता. याशिवाय इंफोलिंक हे जबरदस्त माध्यम आहे. यासाठी कित्येक वेबसाईट पेड रिव्ह्यूचे काम देत असतात. यामध्ये विंडेल रिसर्च(Vindale Research) आणि एक्सपोटीवी डॉट कॉम(ExpoTv.com)या प्रमुख वेबसाइट तुम्हाला चांगली रक्कम मिळवून देतात.