तुमच्याकडे देखील आहे अशी नोट? तर तुम्हाला मालामाल होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही
तुम्हालाही नोकरीसोबत अतिरिक्त पैसे कमवायचे असतील, तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे.
मुंबई : तुम्हालाही नोकरीसोबत अतिरिक्त पैसे कमवायचे असतील, तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. यासाठी तुम्हाला कोणतीही गुंतवणूक करण्याचीही गरज नाही. आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी कल्पना घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्ही काही मिनिटांच्या मेहनतीने करोडपती होऊ शकता. खरंतर या जगात असे काही लोक असतात, ज्यांना जुन्या किंवा कोणत्याही वेगळ्या वस्तु जमा करण्याचा छंद असतो. त्यांपैकी एक आहे जुन्या नोटा किंवा नाणी जमा करणे. ज्यासाठी ते लोक वाटेल तेवढी रक्कम खर्च करायला तयार असतात.
त्यामुळे जर तुमच्याकडे 786 नंबर असलेली 1, 5, 10, 20, 50, 100 किंवा 2000 रुपयांच्या नोटा असतील, तर तुम्ही घर बसून पैसे कमाऊ शकता.
आता हे पैके कधी आणि कसे मिळतील? हे जाणून घ्या
आजकाल असे अनेक वेबसाइट्स आहेत, ज्यावर ही नाणी विकली जातात. ही नाणी तुम्ही इंडिया मार्ट, ई-बे (ईबे, वेबसाइट), क्विकर सारख्या साइट्सवर विकू शकता.
786 क्रमांकाला इतके महत्व का?
हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असावा की, या नंबरसाठी कोणी इतके पैसे का देईल? वास्तविक, धर्म आणि नियतीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची कमी नाही. इस्लाममध्ये 786 या क्रमांकाला खूप महत्त्व आहे आणि इस्लामचे लोक याला अतिशय पवित्र मानतात. तथापि, 786 बद्दल वेगवेगळ्या धार्मिक तज्ञांची मते भिन्न आहेत. आणि यामुळेच बहुतेक सर्व जाती-समुदायातील लोक याला भाग्यवान मानतात.
नोटा कशा आणि कुठे विकायच्या हे जाणून घ्या?
यासाठी तुम्ही प्रथम www.ebay.com वर जा.
आता मेन पेजवर 'विक्रेता' म्हणून स्वतःची नोंदणी करा.
आता साइटवर तुमच्या नोटीचा स्पष्ट फोटो अपलोड करा.
जुन्या नोटा आणि नाणी घेण्याचे शौकीन असलेल्या लोकांना ईबे तुमची जाहिरात दाखवेल.
आता ज्यांना ही पुरातन नोट खरेदी करण्यात रस आहे ते तुम्हाला संपर्क साधतील.
यानंतर, तुम्ही तुमच्यानुसार येथे डिल करुन तुमची नोट विकू शकता.
किती पैसे कमावता येईल?
Ebay च्या वेबसाइटवर नोंदणी करून तुम्ही 5, 10, 20, 50, 100, 200, 500, 2000 रुपयांच्या 786 क्रमांकाच्या नोटा विकू शकता. या नोटा तुम्हाला मोठी रक्कम देऊ शकतात. आतापर्यंतच्या किंमतीवर नजर टाकली, तर अशा नोटेसाठी 3 लाख रुपयांपर्यंत बोली लागली गेली आहे.
हे लक्षात घ्या की पैशांशी संदर्भात व्यवहार हे जोखमीचे असू शकतात, त्या संपूर्ण व्यवहार करताना काळजी घ्या आणि स्वत:च्या जबाबदारीवर डील करा.