नवी दिल्ली : महिला वर्ग केसांची काळजी घेण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रॉडक्टचा वापर करतात. अनेक महिला घरगुती उपाय देखील करतात. काहींचे केस चांगले नसल्यासं महिला हेयर ट्रीटमेंट (Hair Treatment) घेतात आणि त्यासाठी किंमत देखील मोजतात. पण तरी देखील केस गळणं किंवा इतर समस्या दूर होत नाहीत. तुम्हाला माहिती आहे आपण ज्या केसांसाठी हजारो रूपये खर्च करतो, त्याच केसांचा कोट्यावधी रूपयांमध्ये व्यवसाय होतो. तुम्ही देखील केस विकून करोडपती बनू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमी केस विंचरताना खाली पडलेलं केस आपण टाकून देतो. पण हे खाली पडलेले केस खराब नसतात, याच केसांच्या माध्यमातून आपण कोटी रूपयांचा व्यवसाय करू शकतो. भारतात देखील केसांचा व्यवसाय लोकप्रिय आहे. हे केस जास्त किंमतीत विकले जातात. तुमचे केस फक्त 100 किंवा 200 प्रति किलो रूपयाने विकले जात नसून त्या केसांची किंमत 25 ते 30 हजार रूपये प्रति किलो ऐवढी असते. 


काही ठिकाणी तर या केसांच्या बदल्यात भांड देखील दिलं जातं. कमीत कमी ९ इंचचे केस हे लोक विकत घेतात. पण केस घेवून भांडी देणारे हे लोक कोट्यावधी रूपयांच्या व्यवसायाचा एक भाग असतात. कोणत्याही वस्तूंच्या बदल्यात तुमच्याकडून केस विकत घेतले जावू शकतात. त्यानंतर हे केस परदेशात पाठवण्यात येतात. 


भारतातील केसांचा व्यवसाय कोट्यावधी रुपयांचा आहे. हा व्यवसाय स्वातंत्र्यापूर्वीपासून सुरू आहे. भारतातून केस चीन, मलेशिया, थायलंड, बांग्लादेश, श्रीलंका, मालदीव, बर्मा याठिकाणी पाठवले जातात. भारतात मंदिरांमध्ये दान केलेल्या केसांचा देखील व्यवसाय सुरू असतो.