जयपूर : राजस्थानमध्ये अनेक भागात रविवारी सकाळी 9.45 मिनिटांनी भूकंपाचे झटके बसले आहेत. या भूकंपामुळे कोणतंही मोठं नुकसान झालेलं नाही. चौमू भागात ही लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे हे झटके जवळपास 4 सेकंद जाणवले. भूकंपाच्या झटक्यानंतर लोकं घरातून बाहेर पळून मोकळ्या जागेवर धावून आले. 


राजस्थानच्या महार, समोद, अजीतगड, अमरसर या भागातही भूकंपाचे धक्के जाणवलेय. कोणतीही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. मागील आठवड्यात नवी दिल्ली आणि हिमाचल प्रदेशमध्ये देखील भूंकपाचे झटके जाणवले होते.