नवी दिल्ली: दिल्लीचा परिसर मंगळवारी दुपारी ४ वाजून ३३ मिनिटांनी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. पंजाब, जम्मू-काश्मीर आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्येही हे धक्के जाणवले. पाकिस्तानच्या रावळपिंडीपासून ८१ किलोमीटर अंतरावर या भूंकपाचा केंद्रबिंदू होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकन भौगोलिक सर्वेक्षण संस्थेने (यूएसजीएस) दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून ८ किलोमीटर खोलवर होता. लाहोरमध्येही या भूकंपाचा धक्का बसला.


या भूकंपात जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे कोणतेही वृत्त अद्याप आलेले नाही. 


आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात याचा विशेष प्रभाव जाणवला. अनेक लोकांना भूकंपाचे मोठे धक्के जाणवल्याचे सांगितले.