राजधानी दिल्ली, हिस्सारला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का
राजधानी दिल्लीसह उत्तर भारताच्या काही भागांमध्ये आज पहाटे मध्य तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5 रिस्टर स्केल इतकी होती.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह उत्तर भारताच्या काही भागांमध्ये आज पहाटे मध्य तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5 रिस्टर स्केल इतकी होती.
जवळपास पहाटे ४.२५ वाजता हा भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचे हे धक्के दिल्ली, एनसीआर, हिस्सारच्या काही भागात जाणवले. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. या भूकंपाचं केंद्र हरियाणातील रोहतक इथं असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिलीय. तसंच हे केंद्र जमिनीच्या पृष्ठभागापासून २२ किलोमीटर खोलवर असल्याची माहिती मिळतेय.
भूकंपाच्या धक्क्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं. लोक घाबरले... काही जण घरातून बाहेर पळाले... काहींनी सोशल मीडियावर या भूकंपाची माहिती देत इतरांना याबद्दल माहिती पुरवत आपले अनुभवही शेअर केले.