देशात एकाच वेळी तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
earthquake news : शुक्रवारी सकाळी देशातील तीन राज्यांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
earthquake news : भारतीय उपखंडामध्ये भूकंपाचे हादरे जाणवल्यामुळं सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. नॅशनल सेंटर फॉर सेस्मोलॉजीनं (National Center for Seismology) शुक्रवारी X च्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती देत देशात एकाच वेळी तीन विविध राज्यांमध्ये भूकंप आल्याचं स्पष्ट केलं.
यंत्रणांच्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी गुजरातच्या राजकोट मध्ये, मेघालयमधील शिलाँगमध्ये आणि तामिळनाडूतील चेंगलपट्टूमध्ये भूकंप आला आणि नागरिकांमध्ये एकच भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. National Center for Seismology च्या माहितीनुसार राजकोटमध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल इतकी होती. तर, चेंगलपट्टूमधील भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल इतकी होती. शिलाँगमध्ये आलेला भूकंप 3.8 रिश्टर स्केल इतका होता.