By Election 2022 : पोटनिवडणुकीत 2 दिग्गजांच्या बायकांमध्ये कडवी झुंज, कोण जिंकणार?
निवडणूक आयोगाने 3 ऑक्टोबरला एकूण 7 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा (By Election 2022) कार्यक्रम जाहीर केला.
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Comission) 3 ऑक्टोबरला एकूण 7 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा (By Election 2022) कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्र, बिहार, हरियाणा, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि ओडिशात या पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात (Andheri By Election) रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल (Murji Patel ) हे उभे आहेत. या पोटनिवडणुकीकडे राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागलं आहे. (eci mokama bihar assembly by election anant singh and lalan singh wife fight who will win)
दुसऱ्या बाजूला बिहारमध्येही मोकामा या विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक लागली आहे. आमदार अनंत सिंह यांना शिक्षा सुनावल्याने ही जागा रिक्त झाली आहे. दरम्यान या निवडणुकीत 'काँटे की टक्कर' पहायला मिळणार आहे.
या निवडणुकीत 2 दिग्गजांच्या पत्नी उभ्या आहेत. विशेष म्हणजे ही पोटनिवडणूक एकाच कुटुंबात होत आहे. राजदकडून (Rjd) बाहुबली अनंत सिंह यांच्या पत्नी निलम सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून बाहुबली ललन सिंह यांच्या पत्नी सोनम देवी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. या दोन्ही महिला उमेदवारांनी शुक्रवारी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला.
दरम्यान दोन्ही गटांकडून आम्हीच जिंकणार, असा दावा केला जात आहे. त्यामुळे मतदार कुणाला कौल देणार आणि पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.