नवी दिल्ली : नागपूरमध्ये असताना वकील सतीश उके ( Adv Satish uke ) मला भेटले होते. त्यांनी काही कागदपत्रे दाखविली. ते त्यांची लढाई लढत आहे. वकील उके यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्यावर काही कारवाई झालाय नाही. पण, ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर ईडीने ( ED )कारवाई केली. त्यामुळे ते ज्याची केस लढत आहे ते नाना पटोले ( Nana Patole ) यांच्यावरही ईडीची कारवाई झाली तर आश्चर्य वाटणार नाही, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात कारवाई करत आहे ते पाहून आता चिंता करावी असे वाटत नाही. तर, ईडीची गंमत पहावी असे चित्र तयार झाले आहे. आम्हीही एडीकडे काही कागदपत्रे दिली होती. प्रधानमंत्री कार्यालयात ( PM Office )  दिली होती. पण, त्यावर ना ईडीने काही कारवाई केली ना पंतप्रधान कार्यालयाने. केंद्रीय यंत्रणा पाळलेल्या गुंडासारखे करत असेल तर संघ राज्य व्यवस्थेला ते मारक आहे, असे राऊत म्हणाले.


विरोधी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्रात झुंडशाही आणि अराजक निर्माण करत आहे. आता ते म्हणतील 'कर नाही तर डर कशाला?'. पण, तुमच्या कृत्याचे पुरावे दिले तरीही काही कारवाई होत नाही. पण पुरावे देणारे आहेत त्यांच्यावर कारवाई होते. मोदी सरकारच्या न्यायाचा तराजू हा चोर बाजारातील आहे. कुणीही काही गुन्हे केले असतील, अपराध केले असतील तर कायदा हा सर्वांसाठी समान आहे. पण, जिथे भाजपचे मुख्यमंत्री ( BJP CM ) नाही तिथे हा तराजू एका बाजूला झुकलेला दिसतो, अशी टीका त्यांनी केली.


काँगेस आमदारांनी सोनिया गांधी ( Soniya Gandhi ) यांना पत्र लिहिले आहे, यासंदर्भात ते म्हणाले, अशी पत्र लिहिलं जातात. पूर्वी दोन पक्षांचे सरकार होते तेव्हाही अशी पत्र पाठविण्यात अली होती. आमच्या पक्षाच्या आमदारांनीही पक्षप्रमुख पत्र पाठविली होती. आता तीन पक्षाचे सरकार आहे. त्यात काहीजण नाराज असू शकतात. मात्र, तिन्ही पक्षाच्या नेत्यांची सुकाणू समिती असून हे तिन्ही पक्षाने नेते त्यावर निर्णय घेतील.


आरएसएसची ( RSS ) इफ्तार पार्टी


भाजप आम्हाला 'जनाब सेना'  (Janab Sena ) म्हणतेय. ठीक आहे. देशातील २२ कोटी मुसलमान यांचे महत्व त्यांना आता कळले आहे. या देशावर प्रेम करणारे जे मुसलमान आहेत ते आमचे आहेत ही शिवसेनेची भूमिका पहिल्यापासून आहे. जे या मातृभूमीला वंदन करतात ते आमचे आहेत. पण, भाजपची जी भूमिका आहे ते हिंदुत्व नाही. आता त्यांनी ही 'जनाबगिरी' का सुरु केली याचे उत्तर द्यावे.


लाऊडस्पीकर वर गझल आणि कव्वाली ऐकत होता का


भाजपनं धार्मिक तेढ निर्माण करून आणखी एका फाळणीकडे नेऊ नये. महाराष्ट्र्रात पाच वर्ष सरकार होते. तेव्हा लाऊडस्पीकरवर कुणाच्या गजल आणि कव्वाली ऐकत होता का? असा सवाल त्यांनी केला.