नवी दिल्ली : 20 वर्षाची शिक्षा भोगत असणाऱ्या बाबा राम रहीमची कथीत शिष्या हनीप्रीतच्या डायरीमधून मोठा खुलासा झाला आहे. 11 महिन्यांच्या मोठ्या मेहनतीनंतर ही डायरी डिकोड केली गेली आहे. ईडीने हनीप्रीतची ही डायरी डिकोड केली आहे. डायरी डिकोड झाल्यानंतर आता  हनीप्रीतची चौकशी होणार आहे. जवळपास 20 कोटींच्या संपत्तीचा यातून खुलासा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम रहीमला शिक्षा झाल्यानंतर फरार झालेली हनीप्रीत जेव्हा पोलिसांच्या हाती लागली तेव्हा तिच्याकडून 2 डायरी पोलिसांची जप्त केली होती. पॉकेट साईज डायरी डिकोड झाली असली तरी दुसरी डायरी अजूनही डिकोड झालेली नाही. यामध्ये बाबा राम रहीम आणि हनीप्रीतच्या काळ्या पैशांची माहिती असू शकते.


केरळमध्ये राम रहीम आणि हनीप्रीतने मोठी जमीन खरेदी केली आहे. ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील न्यूलँडच्या ऑरेंज काउंटीमध्ये 10 एकर जमिनीपैकी 8 एकर जमिनीवर बदामाची लागवज करण्यात आली आहे. तर 2 एकरवर घर आहे. अमेरिकेत त्यांची बँक खाती देखील आहेत.


राम रहीम आणि हनीप्रीत यांनी अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इटली, जर्मनी आणि न्यूझीलंडमध्ये संपत्ती तयार केली आहे. राजस्थानमध्ये 30 एकर, हरियाणामध्ये 105 एकर, उत्तर प्रदेशमध्ये 15 एकर, उत्तराखंडमध्ये 19 एकर जमीन देखील काही वर्षांपूर्वी खरेदी केली गेली आहे. या जमिनींवर बाग तयार करण्यात आली आहे. एक घर देखील या बागेच्या मध्ये बनवण्य़ात आलं आहे.