मुंबई :Edible Oil Prices Down : : वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे.  घाऊक बाजारात शनिवारी तेल-तेलबिया बाजारात भुईमूग व सोयाबीन तेल, कापूस बियाणे, सीपीओ, पामोलिन तेलाच्या दरात घट झाली आहे. बाजारात नवीन मोहरी पिकाची आवक वाढल्याने मोहरी तेलबियांच्या दरातही घसरण झाली आहे. म्हणजेच आता खाद्य तेलाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत.


मोहरीच्या तेलाचे भाव घसरले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परदेशातून भारतीय बाजारांमध्ये नवीन मोहरी पिकाची आवक वाढली आहे. मोहरी तेल तेलबियांच्या दरात घट झाल्याचे दिसून येत आहेत. यापूर्वी तेल-तेलबियांच्या दरात सातत्याने वाढ होत होती.


तेल कधी स्वस्त होईल


पूर्वी बाजारात सोयाबीन आणि कापूस तेलाच्या तुलनेत मोहरीच्या तेलाचा भाव 25 ते 30 रुपये अधिक असायचा, तोही आता स्वस्त होण्याची शक्यता आहे. 


नवीन पिकांची आवक वाढल्यानंतर 15 ते 20 दिवसांत या तेलाच्या किंमती 5 ते 7 रुपये प्रतिकिलोने स्वस्त होण्याची शक्यता आहे.