Medical Students: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती बजेटची. तेव्हा सर्वसामान्यांपासून ते अगदी श्रीमंतापर्यंत सगळ्यांचेच लक्ष हे अर्थसंकल्पाकडे (Budget 2023) लागले आहे. कोणाकोणाला कुठला कुठला फायदा होणार आहे याकडे आपल्या सर्वांचेच लक्ष वेधले आहे. खासकरून शिक्षण क्षेत्राची वाढती मागणी (Education Sector and Budget) पाहता या क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. त्यामुळे या क्षेत्राची आर्थिक उन्नती करायलाही मोठा वाव निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत सगळ्यांसाठी बजेटमधून काय फायदा होणार आहे याची वाट सगळेच पाहत आहेत. नुकतीच अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman on Students) यांनी शिक्षक भरतीसाठीची घोषणा केली आहे. त्यामुळे शिक्षकांसाठी ही एक मोठी खुशखबर आहे. (Education Budget 2023: Government to establish 157 new nursing colleges alongside 157 existing medical colleges)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात सगळ्यांचे लक्ष असते ते म्हणजे अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांच्या खिशात काय पडले आहे. परंतु यातही अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे आणि खासकरून मेडिकलच्या विद्यार्थ्यांना खूश केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शैक्षणिक क्षेत्रासाठी (Education Sector Announcements) मोठ्या घोषणा केल्या आहेत. मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठी घोषणा केली आहे. 157  नव्या नर्सिंग कॉलेजेसची स्थापन करणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केले आहे. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासाठी प्रोत्साहन देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचसोबतच ICMR लॅब्सना अद्ययावत सुविधा प्राप्त करून देणार आल्याचे त्यांनी सांगितले. 


सध्या राष्ट्रीय नाही तर जागतिक पातळीवर शिक्षण क्षेत्राचे महत्त्व वाढू लागले आहे. भारतातील अनेक विद्यार्थी हे परदेशी (Foreign Education) शिक्षण घेत आहेत तर अनेक परदेशी विद्यापीठं ही भारतात येऊन स्थिरावली आहेत. तेव्हा मूळात शैक्षणिक क्षेत्रात सुरू असणाऱ्या विविध घडामोडी पाहता आता विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं मोठे इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शिक्षणातील संशोधन आणि अभ्यासक्रमामध्ये मोठा बदल घडणे अपेक्षित आहे. त्यातूनच डिजिटल शिक्षणामुळे (Digital Education) विद्यार्थ्यांपुढील आव्हानंही वाढली आहेत. अशातच विद्यार्थ्यांना त्याच्या गरजेनुसार मोठा दिलासाही मिळणे अपेक्षित आहे. 


 


यासोबतच त्यांनी शिक्षण भरतीकडेही मोठं लक्ष्य दिले आहे. येत्या तीन वर्षात त्यांनी 38800 शिक्षकांची भरती करणार असल्याची घोषणा केली आहे. एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये ही भरती होणार आहे. 8000 टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफसाठीचीही मोठी भरती होणार आहे. वरील योजनांसोबतच नॅशनल डिजिटल लायब्ररी (Digital Library) उपलब्ध करून देणार आहे. त्याचसोबतच एकलव्य निवासी शाळांच्या माध्यमातून आदिवासी मुलांना शिक्षण देणार आहेत आणि शिक्षकांची नियुक्ती आदिवासी विकास मिशनच्या माध्यमातून करणार आहेत.