नवी दिल्ली : कोरोना महामारीनंतर पहिल्यांदा बजेट सादर होणार आहे. त्यामुळे यंदाच्या बजेटची प्रतिक्षा सर्वच स्तरातील मंडळी करत आहेत. 1 फेब्रुवारी 2021 रोजी अर्थमंत्री निर्मला सितारामण आर्थिक बजेट सादर करणार आहेत. म्हणून यंदाच्या बजेटमध्ये काय बदल असणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सामान्य करदाता, उद्योजग, वृद्ध, महिला, विद्यार्थी सर्वच आपल्या मागण्याची यादी घेवून तयार आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांनी देखील अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्याकडे महत्त्वाची मागणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमची सहयोगी वाहिनी Zee Businessने काही विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आहे. विद्यार्थ्यांनी अर्थमंत्र्यांकडे एज्युकेशन लोन स्वस्त करण्याची मागणी केली आहे. एज्युकेशन लोन मिळण्यासाठी अत्यंत अडचणी येतात. त्यामुळे एज्युकेशन लोनचे नियम काही प्रमाणात शिथिल करावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 


उद्याचा भारत अजची पिढी घडवणार आहे. भरतात कार लोक तात्काळ मिळतो, मात्र एज्यूकेशन लोन मिळण्यासाठी मोठा कालावधी लागतो असं वक्तव्य एका विद्यार्थ्याने केलं. त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये विद्यार्थ्यांसाठी काही खास तरतूद असेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठारणार आहे. 


शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्प वाढवा
सरकारचे लक्ष शिक्षण क्षेत्रावर आहे. सरकारने नवीन शिक्षण धोरण जाहीर केले, मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय ठेवले गेले. परंतु कोरोना साथीने शिक्षण क्षेत्राच्या गरजा मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात वाढ केली पाहिजे.



गावांपर्यंत वाय-फायची सुविधा
कोरोना काळात शिक्षण क्षेत्राला देखील मोठा फटका बसला. माहामारी दरम्यान ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आला. परंतु गावात इंटरनेटच्या आभावामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. 


अशा परिस्थितीत, वाय-फाय आणि ब्रॉडबँड सेवांचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे. अर्थसंकल्पात दूरसंचार क्षेत्रासाठीचे वाटप वाढवून यावर कार्य केले जाऊ शकते. यामुळे ऑनलाइन शिक्षणाला बळकटी मिळेल.