Education News: महाविद्यालयीन आयुष्याची सुरुवात झाल्यानंतर विविध विषय नव्यानं शिकण्याची विविध शाखांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळते. दिवसागणिक अभ्यास वाढत जातो, अशा या अभ्यासामध्ये आता आणखी काही विषयांची किंवा एका सर्वसमावेशक विषयाची भर पडणआर आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना काहीतरी नवं आणि भविष्याच्या दृष्टीनं उपयुक्त शिकण्याची संधीही मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील सर्वच महाविद्यालयांत लीडरशिप, एआय, मशीन लर्निंग, क्रिटिकल थिंकिंग यांसारखे विषय शिकवले जाणार आहेत. यामध्ये मुलाखतीची तयारी कशी करावी याचंही प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आपल्याला माहिती असावं असं सर्वकाही या अभ्यासक्रमातून शिकवलं जाणार आहे. येत्या काळात सर्वच राज्यांमध्ये शैक्षणित सत्रांमध्ये या अभ्यासक्रमाची सुरुवात होईल. 


नव्या अभ्यासक्रमाचा हेतू काय?


 सामाजिक व वैयक्तिक विकास या यामागचा प्राथमिक हेतू असणार आहे. जिथं विद्यार्थ्यांना संवाद कौशल्यापासून वेळेच्या नियोजनापर्यंतचं शिक्षण दिलं जाणार आहे. शिवाय आव्हानात्मक परिस्थितीशी दोन हात करताना त्यावर तोडगा काढण्याची क्षमता आणि तत्सम प्रशिक्षण इथं दिलं जाणार आहे. 


अभ्यासक्रमामध्ये तणावग्रस्त परिस्थितीशी दोन हात करणं, सोबतच्या व्यक्तींच्या दबावाला सामोरं जाणं अशा मानसिकतांबबातही काही गोष्टी शिकवणं हा या अभ्यासक्रमाचा हेतू असणार आहे.  


कोणकोणत्या विषयांचा समावेश? 


1 - कम्युनिकेशन स्किल्स
जिथं तुमचं मत मांडण्याची पद्धत, सायबर सुरक्षा, प्रभावी लेखन, तांत्रिक बाबी, डिजिटल साक्षरता, सोशल मीडिया आणि अशा अनेक मुद्द्यांवरील माहिती देण्यात येईल. 


2 - प्रोफेशनल स्किल्स (दोन भागात)
या अभ्यासक्रमात करिअर स्किल्स आणि टीम स्किल्स असे दोन विभाग असतील. नोकरीसाठीची मुलाखत देण्यापासून करिअरचे पर्याय शोधणं, प्रेझेंटेशन देणं इतक्या बारीकसारीक गोष्टींवर प्रकाश टाकला जाईल. 


हेसुद्धा वाचा : इस्रोमधील नोकरीकडे IIT च्या विद्यार्थ्यांची पाठ; S Somanath यांनीच सांगितलं यामागचं खरं कारण 


3- लीडरशिप-मॅनेजमेंट स्किल्स
व्यवस्थापनापासून नेतृत्त्वक्षमता आणि आर्थिक व्यवस्थापनाचे धडे इथं शिकवले जातील. 


4- युनिव्हर्सल ह्यूमन व्हॅल्यूज
समाजात वावरताना सामाजिक भान जपमं,  सत्य, अहिंसा, धर्म, शांती, सेवा, त्याग आणि प्रेम - करुणा यांच्यासह संविधानिक मुल्यांबाबतचं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे. 


सर्वसामान्य पदवीधरांना शिक्षणानंतर अनेकदा इतरत्र सर्वसामान्य ज्ञानाअभावी नोकरी नाकारली जाते. पण, आता मात्र सेल्स, मार्केटिंग, बीपीओ, आयटी यांसारख्या क्षेत्रांमध्ये पदवीधरांसाठीही नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात हा अभ्यासक्रम हातभार लावणार आहे.