मुंबई : आपण रोजच्या आयुष्यात अनेकांकडून काही ना काही गोष्टी शिकत असतो. कोणाला काय गोष्टी आवडतात ? कोणाला कोणत्या गोष्टींचा राग येतो ? याचे आपण निरिक्षण करत असतो. पण सरासरी काढली तर आपल्यावर आपल्या जवळच्या पाच मित्रांचा प्रभाव जास्त असतो असे मानले जाते. आता अशी नेमकी पाच माणसं शोधणे सोपे नाही. पण तुम्हाला ज्यांच्यासारखं आयुष्य जगण्याची इच्छा असेल अशा मित्र किंवा सहकार्यांवर तुम्ही बारकाईने लक्ष ठेवू शकता.त्यामुळे तुमच्या जवळच्या मित्रपरिवारामध्ये हे पाच गुण असलेल्या व्यक्ती नक्की असायला हव्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आर्थिक नियोजन 



गुंतवणूक आणि बचतीची गरज समजणारा व्यक्ती स्मार्ट असतो. तो नेहमी पुढचा विचार करुन प्लानिंग करत असतो. कठीण काळ समोर ठेवूनच नव्हे तर परिवाराच्या गरजा ओळखून ते गुंतवणूक करत असतात. तुमच्या आर्थिक स्थैर्यासाठी तुम्हाला अशा लोकांची मदत होईल.  काही मित्र आपल्याला लाईफ इन्श्यूरन्स सारख्या गुंतवणूक योजना काढण्याचा सल्ला देतात.


फिटनेस 



आपले शरीर हे एक प्रकारचे मंदिर आहे असे मानणारा मित्र असणे गरजेचे आहे. जो आपला डाएट आणि व्यायामाची काळजी स्वत: घेत असेल आणि तुम्हालाही तसे करण्यास प्रेरित करेल.


योगा 



योगाचे अनेक फायदे आहेत. एक असा मित्र जो रोज योगा करत असेल त्याची संगतही तुम्हाला फायदेशीर ठरु शकेल.  त्याचा तुमच्या आयुष्यावर शांत प्रभाव पडेल.


लक्ष्य ठरवणारा  



अनेकांना रोजच्या दैनंदिन जीवनासोबतच आयुष्यात काय करायचे आहे हे लक्ष्य ठरलेले असते. त्यांचे पुढच्या काही महिन्यांचे प्लानिंगही तयार असते. असे व्यक्तित्व शोधा जो स्वप्न पाहतो आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपडतो. प्रत्येक महिन्यात 1 किलो वजन कमी करणे हे देखील एखाद्याचे लक्ष्य असू शकते. दररोज पुस्तकाची 50 पाने वाचणे किंवा निवृत्ती योजना आखणे हे देखील एखाद्याचे लक्ष्य असू शकते.


आयुष्यावर प्रेम करणारा 



नेहमी निराशी असणारे मित्र तुम्हाला तक्रारी आणि आळसाचा पाढा वाचून दाखवत असतात. आपल्या आयुष्याचा पूर्ण आनंद घेण्यासाठी तुम्हाला चांगल्या सवयींची गरज आहे. स्वत:वर आणि स्वत:च्या आयुष्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती अनेक गोष्टीत आनंद शोधत असतात.