Egg came first on Hen : आधी अंड की आधी कोंबडी? हा अगदी वैश्विक प्रश्न आहे.  हा प्रश्न शतकानुशतके लोकांना सतावत आहे. हे गूढ उकलण्यासाठी लोकांनी खूप प्रयत्न केले पण यश मिळाले नाही. आता शास्त्रज्ञांना या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. 


जगात पहिली कोंबडी आली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेली एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ब्रिटनमधील शेफिल्ड आणि वारविक विद्यापीठातील अनेक प्राध्यापकांनी अंडी आणि कोंबडीच्या प्रश्नावर संशोधन केले. प्रदीर्घ अभ्यासातून असे दिसून आले की, पहिलं अंडी जगात आलं नसून कोंबडी जगात आली.


तज्ज्ञांना मिळाले पुरावे 


संशोधन पथकाचे नेतृत्व करणारे शास्त्रज्ञ डॉ. कॉलिन फ्रीमन म्हणाले, 'अंडी आधी आली की, कोंबडी याविषयी बऱ्याच दिवसांपासून शंका होती. आता आमच्याकडे पुरावे आहेत जे आम्हाला सांगतात की कोंबडी जगात प्रथम आली.


कोंबडी खाल्याने मिळत खास प्रोटीन 


शास्त्रज्ञांनी सांगितले की, अंड्याच्या कवचामध्ये ओव्होक्लिडिन नावाचे प्रोटीन आढळते. या प्रथिनाशिवाय अंडी तयार होणे अशक्य आहे. हे प्रथिन फक्त कोंबडीच्या गर्भाशयात बनते, म्हणून जगात पहिली कोंबडी आले. तिच्या गर्भाशयात ओव्होक्लिडिन तयार झाले. त्यानंतर हे प्रथिन अंड्याच्या कवचापर्यंत पोहोचले.


शास्त्रज्ञांच्या या संशोधनातून जगात अंड्याच्या आधी कोंबडी आल्याचे समोर आले. मात्र, त्यापूर्वी जगात कोंबडी कशी पोहोचली, हा प्रश्न अद्यापही न सुटलेले कोडेच आहे.