उत्तर प्रदेशात एका शिक्षकाने 8 वर्षाच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झांसी येथे ही घटना घडली आहे. झालं असं की, शिक्षक वर्गामध्ये बसूनच पॉर्न व्हिडीओ पाहत होता. विद्यार्थ्याने शिक्षकाला वर्गात पॉर्न पाहताना पाहिल्यानंतर जोरात हसू लागला होता. यामुळे शिक्षक चिडला आणि विद्यार्थी जखमी होईपर्यंत त्याला जबर मारहाण केली. मुलाला मारहाण झाल्याचं समजल्यानंतर त्याच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कुलदीप यादवला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, कुलदीप यादव हा शिक्षक वर्गात बसून आक्षेपार्ह पॉर्न व्हिडीओ पाहत होता. यामुळे एक विद्यार्थी आणि त्याचे वर्गमित्र जोरजोरात हसू लागले होते. यामुळे कुलदीप यादव इतका चिडला की त्याने विद्यार्थ्याने केसाने धरुन उभं केलं. इतकंच नाही तर त्याने विद्यार्थ्याचं डोकं भिंतीवर जोरात आदळलं. 


मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, "विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियेमुळे कुलदीप यादवचा संताप झाला. त्याने माझ्या मुलाला शिवीगाळ केली आणि अत्यंत बेदम मारहाण केली. त्याने माझ्या मुलाला केसांनी पकडलं आणि त्याचं डोकं भिंतीवर आपटलं. त्याने छडीनेही माझ्या मुलाला मारहाण केली. माझा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या कानालाही जखम झाली आहे. मी याप्रकरणी शिक्षकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे".


मुलाच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शिक्षक कुलदीप यादवला चौकशीसाठी ताब्यात घेतलं घेतलं आहे. पोलीस अधीक्षक (ग्रामीण) गोपीनाथ सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास व गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनी पुढे म्हणाले, “आम्ही शिक्षकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे".