Viral Video: सोशल मीडियामुळे (Social Media) आता अनेक सर्वसामान्य घरातील तरुण-तरुणींनाही एखाद्या सेलिब्रेटींप्रमाणे प्रसिद्धी मिळाली आहे. रिल्सच्या (Reels) माध्यमातून अनेकजण प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. यामधील काही रिल्स तुफान व्हायरल होतात. व्हायरल होणाऱ्या या रिल्समध्ये अनेकजण आपल्या भावना व्यक्त करत असतात. रिल्स करणाऱ्यांमध्ये वयस्कर दांपत्यही मागे नाहीत. अशाच एका वयस्कर दांपत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर काही रिल्स पाहिल्यावर आपल्या चेहऱ्यावर आपोआप हसू येतं. असाच काहीसा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल. 


आपल्या आयुष्यात एक जोदीडार असतो जो आयुष्यभर आपल्या सोबत असतो. त्याच्याप्रती असलेल्या भावना, प्रेम आपण वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करत असतो. सध्या अनेक जोडपी रिल्सच्या माध्यमातून आपलं हे प्रेम व्यक्त करत असतात. फावल्या वेळेत एकमेकांसह रिल्स तयार करत हा एकाप्रकारे एकत्र वेळ घालवण्याचंही कारण असतो. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

इन्स्टाग्रामवर अशाच एका वयस्कर दांपत्याने रिल शेअर केलं आहे. या रिलमध्ये ते दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्या गाण्यावर लिप-सिंक करताना दिसत आहे. 'क्रांती' चित्रपटातील 'ज़िन्दगी की ना टूटे लड़ी, प्यार कर ले घड़ी दो घड़ी' या गाण्यावर हे जोडपं गाताना दिसत आहे. या व्हिडीओला 2 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. 


व्हिडीओत वयस्कर पती खाली खुर्चीवर बसल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे त्यांची पत्नी त्यांना हातवारे करण्यात मदत करत असल्याचं दिसत आहे. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. 


नंदा चौहान यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यानंतर अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या असून हे खरं प्रेम असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.