इंदौर : हिंदीत एक म्हण आहे, 'बूढी घोडी और लाल लगाम'. अशीच एक घटना पाहायला मिळाली. एका ६० वर्षीय वृद्धाने आपला एकटेपणा घालविण्यासाठी लग्न केले. मात्र, आठव्या दिवशीच नववधुने वृद्ध नवऱ्याला हैराण करुन सोडले. तिच्या दणक्याने वर पुरता घायाळ झाला आणि त्याने थेट पोलीस स्टेशन गाठले.


वृद्धाने लग्नाचा विचार केला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवृत्तीनंतर वीज कर्मचारी घरी एकटाच राहत होता. त्याला एकटेपण खायला येत होते. त्यामुळे त्याने लग्नाचा विचार केला. त्यांने ही बाब आपल्या काही मित्रांना सांगितली. त्यानंतर एकाने या वृद्धासाठी वधुचे स्थळ आणले. तिचा मोबाईल नंबर दिला. त्यानंतर संपर्क साधून पुढची बोलणी झालीत. एका देवळात साधेपणाने २२ नोव्हेंबरला लग्नाचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. वृद्धवर आणि तरुण वधु आठ दिवस एकत्र नांदू लागलेत.


 पत्नीच्या निधनानंतर वृद्ध एकटेच


रुपदास बैरागी नावेचे हे वृद्ध पत्नीच्या निधनानंतर एकटेच राहत होते. तसेच त्यांना नातेवाईकही नव्हते. १९९२ मध्ये पत्नीचे निधन झाले. त्यानंतर त्यांना एकटेपणा काढताना त्रास व्हायचा. त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एकाने स्थळ आणलेल्या विधवा ४५ वर्षी महिलेशी लग्न केले. त्यासाठी तिच्यासोबत भाऊ म्हणून एकजण आला होता. त्याचे नाव अशोक होते. महिलेने आपले नाव पुजा म्हणून सांगितले. त्याचवेळी तिच्यासोबत आलेल्याने जितेंद्रने आपण भाऊ असल्याचे सांगितले. लग्न झाल्यानंतर काही दिवस चांगले गेले.


 तरुणीचा दणका


लग्नानंतर २९ नोव्हेंबरला रुपदास बैरागीने दुसऱ्या घराची साफसफाई करण्यासाठी गेला. त्यावेळी नववधुकडे पहिल्या घराची चावी दिली. सोबत आपल्या अलमारीचीही चावीही दिली.  त्याचवेळी नववधुने चलाखी करुन अलमारी उघडली आणि त्यातील जवळपास ३ लाख रुपये आणि काही सोन्याचे दागिणे घेवून पोबारा केला. ज्यावेळी रुपदास बैरागी घरी आला. त्याने हाक दिली तरी घरातून काहीही प्रतिसाद आला नाही. त्याने घराची पाहणी केली. त्यावेळी चोरी झाल्याची घटना त्याच्या लक्षात आली आणि त्याची झोपच उडाली. आपण लग्न करुन फसल्याची जाणीव झाली. रुपदास बैरागीने तात्काळ याची खबर पोलिसांनी दिली.


पोलिसांनी अधिक चौकशी करुन नववधु आणि तिच्यासोबत तोतया आलेल्या भावाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १० हजार रुपये आणि काही माल जप्त केला.