भाजपच्या पप्पू नावाला निवडणूक आयोगाचा आक्षेप
गुजरातमधील निवडणुकीत खुर्ची वाचवण्यासाठी भाजप जोरदार प्रचार करत आहे. अनेक नेत्यांना लवकरच गुजरातमध्ये प्रचार करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. पण त्याआधी निवडणूक आयोगाने भाजपला चांगलाच धक्का दिला आहे.
नवी दिल्ली : गुजरातमधील निवडणुकीत खुर्ची वाचवण्यासाठी भाजप जोरदार प्रचार करत आहे. अनेक नेत्यांना लवकरच गुजरातमध्ये प्रचार करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. पण त्याआधी निवडणूक आयोगाने भाजपला चांगलाच धक्का दिला आहे.
भाजपने निवडणूक जाहिरातीत पप्पू या नावाचा वापर केला आहे. भाजपच्या या जाहिरातीवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेत ती बंद केली आहे. निवडणूक आयोगाने म्हटलं आहे की पप्पू नाव एका विशिष्ट व्यक्तीसाठी हास्यास्पद असू शकतो म्हणून त्यावर बंदी घातली आहे.
वृत्तसंस्थेनुसार, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींसाठी हे नाव वापरलं जातं. निवडणूक आयोगाने याला आक्षेपार्ह म्हटले आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेत्यांनी म्हटलं की, 'निवडणूक संबंधित जाहिरात तयार करण्यापूर्वी ती निवडणूक आयोगाला पाठविली जाते. त्यानंतर एक प्रमाणपत्र मिळतं. पण पप्पू शब्द हा निवडणूक आयोगाला अपमानास्पद वाटतो म्हणून तो काढून टाकण्यास सांगितला आहे. त्याजागी दुसऱ्या शब्दाचा वापर करण्यास सांगितलं आहे.'