सोशल मीडियाला `पेड न्यूज`च्या अटी लागू होणार?
राजकीय पक्षाकडून प्रचारासाठी समाज माध्यमांचा उपयोग
मुंबई : फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सऍपसारख्या समाज माध्यमांना पेड न्यूजच्या अटी लागू करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा विचार आहे. भारतीय निवडणुकांच्या काळात मोठ्या प्रमाणावर पैशांचा उपयोग होतो. राजकीय पक्ष आपल्या प्रचारासाठी या समाज माध्यमांचादेखील उपयोग करत असतात. त्यामुळं इतर माध्यमांना लागू असणारा पेड न्यूजचा नियम फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप आणि इतर समाज माध्यमांना लागू करण्याकडे निवडणूक आयोगानं पावलं उचललीत.
जगात अनेक ठिकाणी या समाज माध्यमांच्या वापराबाबत आक्षेप घेण्यात आलेत. भारतात या माध्यमांचा गैरवापर होऊ नये, यासाठी ही पावलं उचलत असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी 'झी मीडिया'ला सांगितलंय.