मुंबई : सा-या देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागणार आहे. आठ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार असून सर्वात पहिला कल झी २४ तासवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सर्वात वेगवान आणि अचूक निकाल तुम्ही झी २४ तासवर पाहू शकता. तसेच zee24taas च्या संकेतस्थळावर लाईव्ह वाचू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा मोठ्या संख्येनं कमी होणार असल्यात तरी भाजप पुन्हा आपला गड कायम राखणार असल्याचा अंदाज झी मीडियाच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय.  भाजपला  २२३ ते २४८ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्य़ात आला आहे. तर समाजवादी पार्टीला १३८ ते १५७ जागा मिळण्याची शक्यता आहे. बसपाला केवळ ५ ते ११ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला ४ ते ९ जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. 


पंजाबमध्ये सत्तांतराचे वारे वाहण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये आप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला येण्याची शक्यता झी मीडियाच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. आप कदाचित स्वत:च्या बळावर काठावरचं बहुमतही मिळवू शकतं असा अंदाज झी मीडियाच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय. 


गोव्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनण्याची शक्यता आहे. मात्र कुणालाही बहुमत मिळणार नसून त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याचा अंदाज झी मीडियाच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय. 


उत्तराखंडमध्ये सत्तांतर होणार असल्याचा अंदाज झी मीडियाच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय. काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळणार असून भाजपला सत्तेबाहेर जावं लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 


मणिपूरमध्ये पुन्हा भाजपची सत्ता येईल असा अंदाज झी मीडियाच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.