नवी दिल्ली :  अनेकवेळा तुम्ही स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. परंतु आता अशी घटना समोर आली आहे की,  ज्यामुळे तुम्हाला धक्का बसेल. सध्याच्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ लोकांमध्ये खुप आहे. पेट्रोल - डिझेलच्या महागाईमुळे लोकांचा ओढा इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढला आहे. परंतु एका इलेक्ट्रिक स्कूटरला लागलेली भली मोठी आग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. इलेक्ट्रिक वाहनांनादेखील आगीचा धोका आहे का? याबाबत नेटकरी सोशलमीडियावर चर्चा करीत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण
हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावरील अनेक नेटकरी इलेक्ट्रिक वाहनांमधून आगीबाबत भीती व्यक्त करीत आहेत.  हा व्हिडिओ ट्विटर वर @in_patrao या हॅडलतर्फे पब्लिश करण्यात आला आहे. ही नक्की कोणत्या कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर आहे याबाबत नेटकरी विचारणा करीत आहेत. परंतु अद्यापतरी या स्कूटरची ओळख पटलेली नाही.



बाजारात सध्या अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत.  अशा घटनांमुळे ग्राहकांच्या मनात या वाहनांच्या सुरक्षितेतेबद्दल शंका निर्माण होणार हे नक्की.