`या` वाहन धारकांना मिळणार मोठी सूट, केंद्राचा निर्णय; तुमचं वाहन यादीत आहे का?
अतिशय महत्त्वाचा हेतू केंद्रस्थानी ठेवत हा निर्णय घेण्यात आला आहे
नवी दिल्ली : केंद्र सरकारनं (Central Government) अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत देशातील वाहन धारकांना मोठा दिलासा दिला आहे. अतिशय महत्त्वाचा हेतू केंद्रस्थानी ठेवत हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांना आणखी वाव देण्यासाठी म्हणून केंद्र सरकारनं आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून घेण्यात आलेल्या या निर्णयाअंतर्गत (Electric Vehicles) या वर्गात मोडणाऱ्या वाहनांना नोंदणी शुल्क भरावं लागणार नाहीय. केंद्राच्या रस्ते आणि परिवहन मंत्रालयाकडून यासंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत. या वाहनांवर आकारलं जाणारं नुतनीकरण शुल्क म्हणजेच आरसीही माफ होणार आहे.
फक्त चार चाकी वाहनांसाठीच नव्हे, तर दुचाकी, तिन चाकींसाठीही हा नियम लागू असेल. येत्या काळात देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल या आशेनं आतापासूनच केंद्राकडून हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत.
इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी देशात मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता या ठिकाणी जास्त, कमी आणि मध्यम अशा तीन स्वरुपात चार्जिंग पॉईंटची सुविधा करण्यात येणार आहे. पेट्रोल पंपावरच ही सोय करण्यात येईल. सीईएसएल अॅपच्या माध्यमातून यासंबंधीचे व्यवहार करण्यात येतील. नमुद करण्यात आलेल्या ठिकाणांवरील महामार्गांलगतच या चार्जिंग पॉईंटची सुविधा केलेली असेल.