हिवाळ्यात विजेच्या बीलाच टेन्शन सोडा; खूप वापरा गीजर आणि हिटर, फक्त `या` टिप्स फॉलो करा
Electricity Bill Reduce: गीझर आणि हीटर वापरूनही तुम्ही वीज बिल कमी येऊ शकतं. विचारात पडलात ना? पण आम्ही सांगितलेल्या टिप्स फॉलो करुन नक्की हिवाळ्यात बील कमी येऊ शकतं.
How to Reduce Electricity Bill: हिवाळ्यात हीटर आणि गिझर वापरणे सामान्य आहे. यामुळे विजेच्या बिलावर देखील तेवढाच भार पडतो. अशावेळी अनेकजण बिलाचा विचार करुन वीज वापरत अशतात. पण असं न करता तुम्ही गीझर आणि हिटरचा सर्वाधिक वापर करु शकतात. यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.
या टिप्स करा फॉलो
थर्मोस्टॅट वापरा - हीटरमध्ये थर्मोस्टॅट असल्यास, ते कमी तापमानावर सेट करा. यामुळे खोलीचे तापमान नियंत्रित राहून विजेची बचत होईल.
खोली पूर्णपणे बंद करा - हीटर चालवताना खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे बंद ठेवा जेणेकरून उष्णता खोलीच्या आत राहते.
हीटर जास्त चालवू नका - हीटर थोड्याच वेळात संपूर्ण खोली गरम करू शकतो. म्हणून, खोली गरम झाल्यावर, हीटर बंद करा. ते सतत चालवल्याने वीज बिल वाढते.
हीटर स्वच्छ करा - हीटरवर धूळ आणि घाण साचल्याने त्याची कार्यक्षमता कमी होऊ शकते. म्हणून, आपले हीटर नियमितपणे स्वच्छ करत रहा.
गीझरकरिता खास टीप्स
गीझरचा आकार - तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आकारानुसार गिझर निवडा. खूप मोठा गिझर विनाकारण वीज वापरतो. त्यामुळे तुमचे कुटुंब लहान असल्यास मोठ्या आकाराचे गिझर खरेदी करू नका.
स्टार रेटिंग - गीझर खरेदी करताना स्टार रेटिंगकडे लक्ष द्या. जास्त स्टार रेटिंग असलेला गीझर कमी वीज वापरतो.
तापमान कमी ठेवा – गिझरचे तापमान जास्त ठेवू नका.
जास्त वेळ चालवू नका - गरम पाण्याची गरज पूर्ण झाल्यावर गिझर बंद करा. विनाकारण गिझर चालवू नका.
गीझरची सर्व्हिसिंग करा - गीझरची नियमित सर्व्हिसिंग करून घेतल्यास त्याची कार्यक्षमता चांगली राहते.