मुंबई : प्राण्यांना प्रेम द्या ते देखील तुम्हाला प्रेम देतात. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या असण्या नसण्याने फरक पडतो. हीच भावना एका व्हीडिओतून समोर आला आहे. सध्या हत्तीचा व्हीडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. या व्हीडिओने सगळ्यांचं मन हेलावून टाकणारा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हीडिओ इतका खास आहे की, तुम्ही देखील हा व्हीडिओ बघून गहिवराल. हा हत्ती इमोशनल झालेला दिसत आहे. व्हायरस झालेल्या या व्हीडिओ हत्ती जगंलातून चालत येताना दिसत आहे. सगळे लोक त्याला बघत आहेत. यानंतर हत्ती पुढे एका घराकडे जातो. 



पुढे अनेक माणसं एका घरसमोर उभे असतात. तिथे एका व्यक्तीचं पार्थिव ठेवलेलं असतं. तो पार्थिव हत्तीच्या माहुताचं असतं. हत्ती आपल्या माहुताचं अखेरचं दर्शन करायला येतो. हा व्हीडिओ नक्की कुठचा आहे. ते अद्याप कळलेलं नाही. पण या व्हीडिओने सगळ्यांनाच स्तब्ध केलं आहे.