हत्तीला जेव्हा प्रचंड पाण्याची तहान लागली, सोंडेने हँड पम्प उपटून टाकला असेल का? पाहा
हा व्हीडिओ अनेक नेटीझन्सच्या पसंद पडला आहे.
मुंबई : सध्या उन्हामुळे शरीराची लाहीलाही झालीये. प्रत्येक जण उन्हापासून बचावासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत आहे. उन्हामुळे घसा कोरडा होतो. त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात तहान लागते. याला प्राणीही अपवाद नाही. असाच तहानलेल्या हत्तीच्या पिल्लाचा पाणी पितानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हीडिओमध्ये हा हत्तीचा पिल्लू हॅन्डपंप मारत आपली तहान भागवण्याचा प्रयत्न करतोय. हा व्हीडिओ अनेक नेटीझन्सच्या पसंद पडला आहे. अनेकांनी व्हीडिओ शेअरही केला आहे. (elephant pumps tube well to drink water in viral video from Jaldapara)
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हीडिओ पश्चिम बंगालमधील अलीपूरमधीर जलदापारा राष्ट्रीय उद्यानातील आहे. या व्हीडिओतील हत्तीच्या पिल्लाचं वय हे अवघे 9 महिने असल्याचं म्हटलं जात आहे. स्वत: हत्तीने हॅण्डपंप मारत पाणी पिल्याने अनेकांना हा व्हीडिओ वारंवार पाहण्याचा मोह आवरता घेता येत नाहीये.
संबंधित बातम्या :
सोशल मीडियावरील ‘Watermelon Mustard Challenge’, तुम्ही स्वीकारला का?
MARATHA RESERVATION: मराठा समाजाचा उद्रेक झाला तर जबाबदार कोण? उदयनराजेंचा सवाल