हत्ती अतिशय समजूतदार असा प्राणी आहे. कायमच आपण हत्तीचे मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर पाहत असतो. इंटरनेटवर हत्तीच्या पिल्लांच्या व्हिडीओला चांगला प्रतिसाद आहे. अनेकदा थकून मोबाईल हातात घेतला आणि हत्तीच्या पिल्लांचा एखादा व्हिडीओ पाहिला तर सगळा क्षीण निघून जातो. असाच हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

X वर(ट्विटरवर) @buitengebieden द्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हत्ती आपले डोळे चोळताना दिसत आहे. असा व्हिडीओ पहिल्यांदाच समोर आला आहे. ज्यामध्ये चक्क हत्ती डोळे चोळताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'एक हत्तीचं पिल्लू कसं आपल्या डोळ्यांना चोळत आहे. पिल्लू असलं तरीही ते विशालच आहे. एवढं विशाल हत्तीचं पिल्लू सोंडेने डोळे चोळताना दिसत आहे. हा अतिशय वेगळा व्हिडीओ आहे.'


व्हायरल व्हिडीओ



7 जानेवारी रोजी पोस्ट केलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 4.4 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि लोक या व्हिडिओवर खूप वेगवेगळ्या कमेंट्स आल्या आहेत. एका युझरने म्हटले आहे की, "मी आतापर्यंत पाहिलेली ही सर्वात सुंदर गोष्ट आहे." दुसर्‍याने रिप्लाय केला आहे की, "या सगळ्याची मी कधी कल्पनाच केली नव्हती. एकाने म्हटलं आहे की, 'जगातील ही मोहक गोष्ट नाही तर काय आहे?'


अनेकदा आव्हानांनी भरलेल्या जगात, असे हृदयस्पर्शी क्षण आपल्याला पृथ्वीच्या अविश्वसनीय रहिवाशांच्या नैसर्गिक वर्तनाचे निरीक्षण करताना मिळालेल्या साध्या आनंदाची आठवण करून देतात. हत्ती डोळे चोळत असलेला हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे. 


आईच्या कुशीत विसावलं पिल्लू 


काही आठवड्यांपूर्वी आपल्या आईसोबत कळपात फिरणारा हे हत्तीच पिल्लू आपल्या कुटुंबापासून विभक्त झाला होता. तो बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच वन्यजीव अधिकाऱ्यांनी बचावाची तयारी सुरू केली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, एक टीम त्या ठिकाणी पाठवण्यात आली होती जिथे तो त्याच्या आईसोबत शेवटचा दिसला होता. त्याचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेऊन सुमारे तीन किलोमीटरपर्यंत त्याचा शोध घेण्यात आला. जेव्हा अधिकार्‍यांनी त्याला शोधून काढले तेव्हा तो त्याच्या आईला शोधत एकटाच भटकत होता.