Elon Musk Affair:इलॉन मस्कच्या अफेअरचा खुलासा, `या` महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये
मदतीला धावणाऱ्या मित्राच्याच पत्नीशी...; जगातील सर्वात श्रीमंत, Elon Musk चं अफेअर अखेर जगासमोर
मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले आणि टेस्ला आणि स्पेस-एक्सचे प्रमुख इलॉन मस्क त्यांच्या बिझनेस व्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असतात. आता मस्कच्या अफेअरचा खुलासा झाला आहे. एलॉन मस्क मित्राच्याच बायकोला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु आहे.
इलॉन मस्क गुगलचे सह-संस्थापक सेर्गे ब्रिन यांची पत्नी निकोल शानाहान हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची माहीती आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, गुगलचे सह-संस्थापक सेर्गे ब्रिन यांनी काही महिन्यांपूर्वी निकोल शानाहानपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. सेर्गे ब्रिन यांनी आपल्या पत्नीचे एलोन मस्कसोबतच्या अफेअरबद्दल कळल्यानंतर
त्यांनी हे पाऊल उचलल्याची बातमी देण्यात आली होती.
'टेस्ला'ला आर्थिक संकटात मदत
मीडिया रिपोर्टनुसार, इलॉन मस्क आणि सेर्गे ब्रिन हे जवळचे मित्र होते. मस्क सिलिकॉन व्हॅलीमधील ब्रिनच्या घरी सतत भेट देत होते. या काळात मस्क आणि ब्रिनची पत्नी निकोल शानाहान यांच्यात जवळीक वाढली होती. रिपोर्टनुसार, इलॉन मस्क मस्क आणि शानाहान यांच्यातील अफेअर तेव्हा सुरू झाले जेव्हा मस्क आणि त्याची गर्लफ्रेंड ग्रिम्स यांचे ब्रेकअप झाले होते.
दरम्यान 2008 ला ज्यावेळेस इलॉन मस्कच्या इलेक्ट्रिक कार टेस्ला कंपनीवर आर्थिक संकट कोसळले होते. त्यावेळेस टेस्लाला बुडण्यापासून वाचवण्यात सेर्गे ब्रिन यांनी मदत केली होती.
अफेअरमुळे घटस्फोट
सेर्गे ब्रिनने पत्नी निकोल शानाहानसोबतच्या मतभेदांमुळे यावर्षी जानेवारीमध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. या प्रकरणाशी संबंधित नागरीकांचे म्हणणे आहे की, इलॉन मस्क आणि शानाहान यांच्यातील अफेअर उघड झाल्यानंतर काही आठवड्यांनी ब्रिनने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मात्र, तूर्तास ब्रिनच्या वकिलाने या प्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
दरम्यान इलॉन मस्क आणि शानाहान यांच्याकडून या अफेअरवर अद्याप प्रतिक्रिया समोर आली नाही आहे. मात्र ब्रिनच्या घटस्फोटासाठी अर्जाने इलॉन मस्कच्या अफेअरच्या चर्चांना ऊत आले आहे.