Mukesh Ambani यांना टक्कर देण्यासाठी Elon Musk सज्ज
इंटरनेट जगतात होणार मोठे बदल
मुंबई : एलन मस्क ( Elon Musk ) नावाच्या व्यक्तीला कोण ओळखतं नाही? जगभरात मोठ्या उद्योजकांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. अग्रगण्य उद्योजकांमध्ये ओळखल्या जाणाऱ्या एलन मास्क यांना भारतात व्यवसाय करायचा आहे. स्टारलिंग प्रोजेक्टच्या अंतर्गत एलन मास्क यांनी भारत सरकारकडे व्यवसायाकरता परवानगी मागितली आहे. पण आता भारत सरकार काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांच लक्ष लागलं आहे.
काय आहे स्टारलिंक प्रोजेक्ट
टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने देशात ब्रॉडबँड कनेक्टिविटी (Broadband Connectivity)ला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये एक कंसल्टेशन पेपर जाहीर केला होता. यानंतर SpaceX ने भारतात बिझनेस देण्याकरता परवानगी मागितली होती. SpaceX ची Vice President of Satellite Government Affairs पैट्रीशिया कपूर (Patricia Cooper) ने सांगितलं की,स्टारलिंकचे हाय स्पीड सॅटेलाइट नेटवर्कच्या माध्यमातून भारतातील सगळ्या लोकांना ब्रॉडबँक कनेक्टिविटीशी जोडण्यासाठी मदत करेल.
SpaceX कंपनीची प्रोफाइल
स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन (SpaceX) ने स्टारलिंक इंटरनेट सर्विसकरता १ हजाराहून अधिक सॅटेलाइट सोडले आहेत. अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडामध्ये SpaceX चे लाखो ग्राहक आहे. SpaceX च्या गुतंवणूकदारांचं म्हणणं आहे की, स्टारलिंकची नजर इन-फ्लाइट इंटरनेट, मॅरिटाइम सर्विसेस, भारत आणि चीनमधील ग्रामीण भागात याची मागणी आहे. येथे एक बजार एक ट्रिलियन डॉलरपर्यंत आहे.
सोपी नाही SpaceX चा मार्ग
SpaceX च्या स्टारलिंक प्रोजेक्टला भारतात परवानगी मिळाली तर रिलायन्स ग्रुपसोबत मोठी टक्कर होणार आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ (Reliance Jio) मधून SpaceX चा मुकाबला होणार आहे. बँक ऑफ अमेरिका ग्लोबल रिसर्चच्या रिपोर्टनुसार जिओ ४ जी रोल आऊट भारताच्या इंटरनेट क्षेत्रात गेम चेंजर म्हणून काम करेल. जिओच्या दराच्या बदलामुळे याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. भारतात आता जवळपास ६५ करो़ड इंटरनेट युझर्स आहेत. जे सरासरी १२ GB डेटा दर महिन्याला वापरतात. जिओने स्वस्त दरात डेटा आणि सेवा दिल्यामुळे बाजारात मोठा वापर होत आहे.