#TwitterDown : काल Gmail आज ट्विटर डाऊन! युझर्सना येतायत अडचणी
#TwitterDown : देशभरातील ट्विटर डाऊन झाल्याची (Twitter Down) बातमी समोर आली आहे. अनेक युझर्सकडून या संदर्भातील तक्रारी समोर आल्या आहेत. युझर्सना ट्विटर पेज लोड करण्यात अडचणी येत आहेत.
#TwitterDown : जगभरातीत सर्वात श्रीमंत व्यक्ती, स्पेस एक्सचे सीईओ आणि ट्विटरचे प्रमुख एलन मस्क यांचे ट्विटर डाऊन (Twitter Down) झाले आहे. देशभरातील अनेक नागरीकांनी ट्विटर डाऊनच्या तक्रारी भेडसावतायत. या तक्रारीमुळे आता ट्विटरवरच #TwitterDown असे ट्रेडं होऊ लागले आहे. या ट्रेंडखाली नागरीक तक्रारी करतायत,तसेच भन्नाट मीम्स देखील शेअर करत आहेत.
'या' कारणामुळे #TwitterDown
देशभरातील ट्विटर डाऊन झाल्याची (Twitter Down) बातमी समोर आली आहे. अनेक युझर्सकडून या संदर्भातील तक्रारी समोर आल्या आहेत. युझर्सना ट्विटर पेज लोड करण्यात अडचणी येत आहेत. या तक्रारीमुळे आता ट्विटरवरच #TwitterDown असे ट्रेडं होऊ लागले आहे. या ट्रेंडखाली नागरीक तक्रारी करतायत.
कधीपासून बंद आहे?
भारतात संध्याकाळी ७ वाजता या आउटेजची माहिती डाऊनडिटेक्टरने दिली आहे. यामध्ये 2,838 आउटेजचा समावेश आहे. या आउटेजमध्ये अनेकांची टाइमलाइन रिफ्रेश होत नव्हती, तर अनेकांची खातीच अस्तित्वात नसल्याच्या सूचना येत होत्या. या आउटेजबाबत सोशल मीडिया कंपनी ट्विटरकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
युझर्सचं म्हणणे काय?
अनेक युझर्सचं असं म्हणणे आहे की, ट्विटर अॅप (Twitter Down) फक्त अँड्रॉइड हँडसेटसाठी डाउन होते. तर काहींनी असा दावा केला की अॅप काही नेटवर्कवर काम करत आहे आणि इतरांवर बंद आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने दावा केला आहे की ट्विटर व्हीपीएन कनेक्शनसह चांगले काम करत आहे.
दरम्यान अनेक युझर्सना (Twitter Down)अशी समस्या येत आहे. आता ही ट्विटरची सेवा कधी सुरळीत होईल याकडे युझर्सचे लक्ष लागले आहे.