Old Man Counting Coins: सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर एका पेक्षा एक सरस व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. तर काही व्हिडीओ पाहिल्यानंतर डोळ्यात अश्रू येतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. एक वृद्ध व्यक्ती दिवसभर मेहनत करून मिळालेल्या मोबदल्याची मोजणी करत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांच्या काळजात हात घातला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवर एक वृद्ध व्यक्ती बसलेली दिसत आहे. ही व्यक्ती सायकलवर दिवसभर किरकोळ वस्तू विकून दिनचर्या चालवते. वयोवृद्ध व्यक्ती नोटा मोजल्यानंतर एक एक करून नाणी मोजत आहेत. एक एक पैसा किती महत्त्वाच्या हे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावामुळे स्पष्ट होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती आपली रोजची कमाई मोजताना दिसत आहे. 'जिंदगी गुलजार है' नावाच्या युजरने ट्विटरवर 'दिनभर की कमाई' या कॅप्शनसह व्हिडीओ शेअर केला आहे. या छोट्या व्हिडिओमध्ये, एक वृद्ध व्यक्ती दिवसभरात कमावलेले पैसे मोजताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवर बसून तो नोटा आणि नाणी मोजत आहे. व्हिडीओच्या शेवटच्या सेकंदात तुम्ही वृद्ध व्यक्तीचे हावभाव पाहिले तर कळून येईल की, पैसे कमी आहेत आणि त्यामुळे ती व्यक्ती पुन्हा खिसा चाचपते.



व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्स भावूक


ट्विटरवर अपलोड केल्यापासून हा व्हिडिओ 3 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. एका यूजरने लिहिले की, 'देवा, अशा लोकांची मदत कर आणि आमच्या नेत्यांना मानवी विकासावर लक्ष केंद्रित करण्याची बुद्धी देवो.' दुसऱ्या  युजरने लिहिले की, 'काही दिवसांपूर्वी मी सकाळी एका ई-रिक्षावर होतो, तो माणूस या माणसाच्याच वयाचा होता. मी त्याला 20 रुपयांची नोट दिली, त्याने कपाळाला हात लावला, चुंबन घेतले. मी इतका भावूक झालो की मी त्याच्याशी बोलू शकलो नाही.'