Employee`s Pension Scheme | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर खासगी कर्मचाऱ्यांच्या पेंशनमध्ये भरघोस वाढ शक्य
सर्वोच्च न्यायालयातून खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयानंतर कर्मचारी भविष्य निधी(EPF)मध्ये अंशदान करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांची पेंशन 300 टक्क्याहून अधिक वाढू शकते.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातून खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयानंतर कर्मचारी भविष्य निधी(EPF)मध्ये अंशदान करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांची पेंशन 300 टक्क्याहून अधिक वाढू शकते. EPFO ने कर्मचाऱ्यांच्या पेंशनसाठी त्यांचा कमाल पगार 15 हजार निश्चित केला आहे. तुमचा पगार 15 हजाराहून जास्त असला तरी, पेंशनची गणना कमाल 15 हजाराच्या पगाराहून होत असते.
एका निर्णयामुळे अनेकपट वाढू शकते पेंशन
आता सर्वोच्च न्यायालय EPFO च्या या पगार मर्यादेला हटवू शकते. या मुद्द्यावर सलग सुनावणी सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या पेंशनची गणना शेवटच्या पगाराच्या म्हणजेच हाय सॅलरी ब्रॅकेटवर होऊ शकते. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा पगार अनेक पट वाढू शकतो. परंतु पेंशन मिळवण्यासाठी 10 वर्षापर्यंत EPFमध्ये योगदान देणे आवश्यक असेल. तसेच 20 वर्षाची नोकरी केल्यानंतर नोकरी पूर्ण केल्यानंतर 2 वर्षाचे वेटेज मिळते.
कशी वाढणार पेंशन
सध्याच्या व्यवस्थेनुसार कर्मचाऱ्याला 14 वर्षाची नोकरी केल्यानंतर पेंशन हवी असेल. तर पेंशनची गणना 15 हजारावरच होते. त्यांचा शेवटचा पगार 20 हजार असला तरीदेखील. कर्मचाऱ्याला नोकरीची 14 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 3000 रुपये पेंशन मिळेल.
सर्वोच्च न्यायालयाने पेंशनसाठी पगार मर्यादा हटवल्यास, शेवटच्या पगारावर पेंशन लागू झाल्यास, पेंशनची रक्कम वाढू शकते. जर कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार 20 हजार असेल तर (20000 X14)/70=4000 रुपये इतकी पेंशन मिळू शकेल.