मुंबई : सगळ्यांनीच आतापर्यंत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे इंजेक्शन्स हे घेतलेच असणार. म्हणजे आपण अगदि लहान बाळाला सुद्धा इंजेक्शन देतो. त्यावेळी तुम्ही पाहिले असेल की, डॉक्टर त्या सिरिंजमध्ये औषध भरतात आणि त्यातील हवा काढून टाकतात. सिरिंजमधून हवा काढून टाकण्यासाठी दोन पद्धती वापरल्या जातात. सिरिंजमध्ये असलेली हवा काढून टाकण्यासाठी डॉक्टर एकतर आपल्या बोटाने त्यावर मारतात जेणेकरून हवेचा बनलेला बबल संपतो किंवा दुसरापर्यांय म्हणजे सिरिंजमध्ये भरलेले औषध थोडेसे काढून टाकले जाते जेणेकरून त्यासह हवा बाहेर येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का की,डॉक्टर असे का करतात? सिरिंजमध्ये भरलेली हवा का काढली जाते? त्याचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.


शरीरात हवेचे फुगे तयार होतात


कोणत्याही रुग्णाला इंजेक्शन लावण्यापूर्वी, डॉक्टर किंवा नर्स सिरिंजमध्ये असलेली हवा काढून टाकतात. जर हे केले नाही तर, औषधाबरोबरच आपल्या शरीरात एअर बबलही प्रवेश करतात, ज्यामुळे रक्त प्रवाहात अडचण येऊ शकते.


हे बबल आपल्या मेंदूत रक्त प्रवाहात अडथळा आणू शकतात, ज्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. एवढेच नाही तर, इंजेक्शनद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करणारे बबल हृदयाच्या जवळ गेले तर, ते मृत्यूला देखील कारणीभूत ठरू शकतात.


तज्ञ सांगतात की, जर हा बबल  छोटा असेल तर तो थोडा कमी धोकादायक असू शकतो, परंतु जर हा बबल मोठा असेल तर तो खूप धोकादायक असू शकतो ज्यामुळे एखाद्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो.


रिकाम्या इंजेक्शनमुळे मृत्यू होऊ शकतो


बर्‍याच लोकांच्या मनात असा प्रश्न पडत असेल की, रिकामी इंजेक्शन देऊन काय होत असेल? सर्व प्रथम, आपणास हे माहित असणे आवश्यक आहे की, इंजेक्शनचे कार्य शरीरात औषध टाकणे असते, हवा टाकणे नाही. रिकाम्या इंजेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात हवा असते.


जर एखाद्याला रिकामी इंजेक्शन दिले गेले तर, त्याच्या शरीरात हवेचे मोठे बबल तयार होऊ शकतात, ज्यामुळे रक्त प्रवाह पूर्णपणे थांबू शकतो आणि यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून रिकाम्या इंजेक्शनने कोणाचीही चेष्टा करु नका किंवा मस्करीत देखील याचा वापर करु नका.