पोलिसांकडून २४ तासात ४ मोठे एनकाऊंटर
गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठी गुन्हेगारांविरोधात एनकाऊंटर जारी केलं आहे.
लखनऊ : पोलीस आणि एसटीएफच्या संयुक्त पथकाने उत्तर प्रदेशात 24 तासात ४ मोठे एनकाऊंटर केले आहेत, वाढणाऱ्या गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठी गुन्हेगारांविरोधात एनकाऊंटर जारी केलं आहे.
अट्टल गुन्हेगार जेरबंद
पोलिसांनी काही दिवसांत, अनेक अट्टल गुन्हेगारांना जेरबंद केलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काय़दा व सुव्यवस्था राखण्याचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
संध्याकाळी चकमक
मुझफ्फरनगर, नोएडा आणि मेरठमध्ये शुक्रवारी संध्याकाळी चकमक झाली, पोलीस आणि गुन्हेगारांची संध्याकाळी उशीरा कनोजमध्ये ही झटापट झाली. यामध्ये १ गुन्हेगार जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. कनोजमध्ये पोलिसांनी 60 लाख बॅटरी आणि एक ट्रकसह 10 जणांना दोन दिवसाआधी बेड्या ठोकल्या होत्या.
मेरठमध्ये एक जखमी
मेरठमध्ये 10 हजार रूपये बक्षिस असणाऱ्या फकरूद्दीन यालाही पोलिसांनी पकडलं. चकमकीत जखमी झालेल्या फकरूद्दीनला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. फकरूद्दीनवर अवैध हत्यार बनविण्याचा आरोप आहे.
नोए़डामधून २ जेरबंद
नोएडाच्या टीपीनगर भागातून पोलिसांनी दोन गुन्हेगारांना अटक केली. या दोघांनी चोरलेल्या कार, लॅपटॉप, मोबाइल फोन, काडतूसं पोलिसांनी जप्त केली. अंकित शर्मा आणि राहुल अशी या दोघांची नावं असून या दोघांवर दहा-दहा हजरा रूपयांचं बक्षिस होतं.
कॉन्ट्रॅक्ट किलर इंद्रपाल ठार
याआधी उत्तर प्रदेश पोलीस आणि एसटीएफच्या पथकाने बक्षिस असलेला कॉन्ट्रॅक्ट किलर इंद्रपालला मुझफ्फरनगर एनकाऊंटरमध्ये मारलं होतं. यूपी पोलिसांनी ट्विटरवरून यांसदर्भातील माहिती दिली.
गोळीबार सुरू असताना इंद्रपालला गोळी लागली. या गोळीबारादरम्यान एसटीएफचे एसआयही जखमी झाले होते. इंद्रपालवर हत्या आणि दरोड्याच्या तीन डझन केसेसे दाखल असल्याचं समोर आलं.