श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेकी यांच्यात झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. पोलीस आणि सीआरपीएफ एकत्रितपणे संयुक्त कारवाई करीत आहे. मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली गेली आहे. ही चकमक श्रीनगरच्या जदीबालच्या पॉजवालपोरा भागात झाली. आज सकाळी दहशतवादी या भागात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने म्हटले की, 'आम्ही अतिरेक्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी सांगितले. दहशतवाद्यांना अपील करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला देखील बोलवण्यात आलं पण दहशतवाद्यांनी नकार दिला. त्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलाने कारवाई केली.


सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३ दहशतवादी ठार झाले असून या भागात सर्च ऑपरेशन सुरु आहे. याआधी हिज्बुलचा कमांडर जुनैद शाहराईसह 3 अतिरेक्यांना ठार केले गेले होते.