जम्मू-काश्मीरमध्ये जवानांनी 5 दहशतवाद्यांना केलं ठार
जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठं यश
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांना मोठं यश मिळालं आहे. रविवारी जवानांनी येथे 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर देखील यामध्ये मारला गेला आहे. सुरक्षा रक्षाकांनी हिजबुलचा कमांडर सदाम पद्दार आणि त्याच्या दोन साथीदारांना बिलाल मौलवी आणि आदिलला ठार केलं आहे. दुसरीकडे दहशवतादी मोहम्मद रफीला देखील जवानांनी ठार केलं आहे. रफी हा कश्मीर यूनिवर्सिटीमध्ये प्रोफेसर देखील होता.
या कारवाई दरम्यान 2 जवान जखमी झाले आहेत. प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव दक्षिण काश्मीरमध्ये मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं की, शोपियाच्या जैनापुरा भागात बडीगाम गावामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. सूचना मिळाल्यानंतर जवानांनी संपूर्ण परिसराला घेरलं आणि शोध मोहिम सुरु करत कारवाई केली.
अधिकाऱ्यांनी म्हटलं की, सर्च ऑपरेशन सुरु असतांनाच जवानांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. दहशतवाद्यांच्या या फायरिंगमध्ये 2 जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.