नवी दिल्ली : लग्न करावे, संसार थाटावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. काहींचा प्रेमविवाह होतो तर काहींचे ठरवून वगैरे लग्न होते. पण बंदूकीचा धाक दाखवून लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


काय आहे हा प्रकार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमध्ये एका २९ वर्षीय इंजिनिअरचे अपहरण करून बंदुकीचा धाक दाखवत त्याचे बळजबरीने लग्न लावून दिले. त्याच्या अपहरणाचा व्हिडिओ समोर आला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.


या तरुणाचे नाव विनोद कुमार असून झारखंड जिह्यातील बोकारो येथील स्टिल प्लांटमध्ये तो काम करतो. ३ डिसेंबरला हा पाटण्यात मित्राच्या लग्नासाठी निघाला. तो हतिया- पाटणा एक्स्प्रेसने प्रवास करत होता. मात्र प्रवासादरम्यान सुरेंद्र यादव व त्याच्या साथीदारांनी विनोद कुमारचे अपहरण केले. बंदुकीचा धाक दाखवून त्याचे एका मुलीशी लग्न लावण्यात आले. त्याचा विरोधाला बंदुकीचा धाक आड येत होता. इच्छेविरुद्ध लग्न होत असल्याने विनोदकुमार मांडवातच ढसाढसा रडू लागला. हा सर्व प्रकार व्हिडिओत कैद केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. 



अशी केली त्याची सुटका


विनोद कुमारचा भाऊ माध्यमांशी बोलताना म्हणाला की, माझ्या भावाचे अपहरण करुन त्याचे लग्न लावून देण्यात आले. अपहरणकर्त्यांनी आम्हाला फोन करुन विनोदकुमारचे लग्न झाल्याची माहिती दिली. याप्रकरणी पोलीसांची मदत घेण्यासाठी गेले असता त्यांनी दाद न दिल्याने शेवटी पाटण्याच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. आणि विनोद कुमारची सुटका केली.
मात्र त्यानंतर विनोद कुमारच्या कुंटुंबियांना सुरेंद्र यादवच्या गुंडांनी धमक्या देण्यास सुरूवात केली.