मुंबई : तुमचं लग्न ठरलं असेल, तर सावध राहा! काही भामटे वेगवेगळ्या मार्गाने लोकांकडून पैसे उकळण्याच्या किंवा चोरण्याच्या तयारीत असतात आणि आपल्याला त्याचा थांग पत्ता देखील लागत नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती घेऊनच पुढचं पाऊल टाका. मुंबईमधूल एक अशी बातमी समोर आली आहे जी धक्कादायक आहे. या प्रकरणार थाटामाटात लग्न करुन आणि अडीच कोटी रुपये घेऊन नवरदेवाने पळ काढला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वधूपक्षाकडून अडीच कोटी घेऊन इंदूरच्या एका फसव्या सॉफ्टवेअर इंजिनिअर नवरदेव अमेरिकेला पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील उदयपूर येथील ताज लेक पॅलेसमध्ये या ठाग्याने मुंबईतील एका तरुणीशी लग्न केलं, ज्यानंतर त्याने लग्नात एकूण सुमारे अडीच कोटी रुपये हुंडा घेऊन पळ काढला असल्याची घटना समोर आली आहे.


लग्नानंतर महिनाभरानंतर नवरदेव अमेरिकेला पळून गेला. परंतु हे असं करण्याची त्याची ही पहिलीच वेळ नाही. या ठग्याने यापूर्वीही दोन मुलींसोबत असेच केले आहे.


या नववधूने तिचा नवरा आणि सासऱ्यांविरुद्ध मुंबईतील मंटुआ पोलिस ठाण्यात हुंड्यासाठी छळ, फसवणूक, मारहाण यासह अनेक प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल केली आहे. असाच प्रकार दोन मुलींसोबत केल्याचा आरोप देखील या नववधूने या व्यक्तीवर केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


उदयपूरच्या ताज लेक पॅलेसमध्ये लग्न आणि फसवणूक
लासुदिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतीनिकेतनमध्ये राहणारा विशाल अग्रवाल हा सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. पलासिया येथील शेखर बिल्डिंगमध्ये त्यांचे ऑफिस आहे. त्याचे वडील विमल अग्रवाल हे तुकोगंज परिसरात प्रॉपर्टीचे काम करतात.


संजना पार्कमधील रहिवासी आणि डाळीचे व्यापारी अनिल मंगल आणि सुधा मंगल यांनी त्यांची मुलगी निधीचे लग्न शेअर कमोडिटीशी संबंधित अजय अग्रवालशी ठरवले होते. परंतु त्याच्या घरच्यांनी सांगितले की, विशालशी लग्न करून निधी जास्त आनंदी आणि सुखात राहिलं.


यानंतर निधी आणि विशालचे लग्न निश्चित झाले. विशालने एंगेजमेंटसाठी 70 लाख रुपये हुंडा घेतला होता. निधी आणि विशालचे लग्न 25 एप्रिल 2021 रोजी उदयपूरच्या ताज लेक पॅलेसमध्ये पार पडलं.


लग्नाच्या महिनाभरानंतर कामाच्या बहाण्याने पळून गेला


लग्नाच्या महिनाभरानंतर कामासाठी विशाल अमेरिकेला पळून गेला. त्यानंतर निधीचे सासरे विमल अग्रवाल, अलका अग्रवाल, आंचल, आदित्य गर्ग, नीरज द्विवेदी, अनिल आणि सुधा यांनी तिला त्याच्या माहेरी पाठवण्याचा कट रचला.


निधीने पोलिसांना सांगितले की, आजूबाजूच्या लोकांशी संवाद साधला असता समजले की, विशालने यापूर्वी दोनदा लग्न केले होते. लग्नानंतर आठ दिवसांनी तो पळून गेला. दोन्ही लग्नात त्याच्या कुटुंबीयांनी हुंडाही घेतला होता.


लग्नासाठी 70 लाख आणि लग्नासाठी 90 लाख हुंडा


निधीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, लग्नाच्या वेळी विमल अग्रवाल यांना 70 लाख रुपये रोख स्वरूपात दिले होते. लग्नात 50 तोळे सोने आणि 300 ग्रॅम चांदीचे दागिने असा 90 लाखांचा मुद्देमाल हुंडा म्हणून देण्यात आला होता.


यासोबतच विमल अग्रवाल यांच्याकडून वैयक्तिक कामासाठी १८ लाखांची रोकड घेतली होती. याशिवाय इतर काम सांगून पैसे घेतले. एकूण त्यांची सुमारे अडीच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.